Thursday, 8 June 2023

उपायुक्त अतुल पाटील यांनी आज केली ७/ह प्रभाग परिसराची पाहणी !

उपायुक्त अतुल पाटील यांनी आज केली ७/ह प्रभाग परिसराची पाहणी !

*दंडात्मक कारवाईत केली रु. ६९००/- वसुली*

कल्याण, नारायण सुरोशी : महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त अतुल पाटील यांनी आज अचानक ७/ह प्रभाग परिसरात मान्सुनपूर्व गटार सफाईची व दैनंदिन स्वच्छतेची पहाणी केली. यावेळी उप मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलूरकर, स्वच्छता निरिक्षक अनिकेत धोत्रे, दिलीप भोईर, सलीम शेख व दिलीप चव्हाण उपस्थित होते. डोंबिवली पश्चिम परिसरातील गजानन प्रसाद चाळ, पंडीत दिनदयाळ रोड, घनश्याम गुप्ते रोड, अवधुत सोसायटी इत्यादी परिसराची पहाणी करताना , पहाणी दरम्यान गटार सफाई ठेकेदार सागर पेठेकर यांना गटार सफाईचा गाळ वेळच्या वेळी उचलण्याच्या  त्यांनी सुचना दिल्या आणि रस्त्यावर पडलेले डेब्रिज, माती उचलणाऱ्या यंत्रणेची देखील पहाणी  केली. गोपी टॉकीज येथील फेरीवाल्यांना कचरा कुठेही टाकू नये, प्रतिबंधित प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करु नये अन्यथा कारवाई केली जाईल या बदद्ल ताकीद देण्यात आली असून यापुढे असे वर्तन घडल्यास फेरीवाल्यांवर सक्त कारवाई करणेबाबत संबंधित अधिका-यांना निर्देश दिले आहेत.

सदर परिसरातील व्यापाऱ्यांनी कचरा वर्गीकरण न केल्याबदद्ल अमन जयस्वाल, चंद्रशेखर यांना प्रत्येकी रु. ३०००/- प्रमाणे एकूण रु. ६०००/- दंड आकारण्यात आला,तसेच रस्त्यावर कचरा टाकत असलेल्या तीन नागरिकांकडून प्रत्येकी रु. ३००/- प्रमाणे रु. ९००/- दंड आकारण्यात आला. याप्रमाणे एकूण रु.६९००/-इतका दंड वसूल करण्यात आला.

No comments:

Post a Comment

“कर्तृत्व, जिद्द आणि सेवाभावी कार्याचा प्रेरणादायी प्रवास” जुचंद्र येथे श्री. सुरेश तुकाराम राऊत सर यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न !!

“कर्तृत्व, जिद्द आणि सेवाभावी कार्याचा प्रेरणादायी प्रवास” जुचंद्र येथे श्री. सुरेश तुकाराम राऊत सर यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ मोठ्या उत...