Saturday, 3 June 2023

मनसेच्या रस्ते आस्थापना व साधन सुविधा या विभागाचे घाटकोपर पूर्व - पश्चिमचे प्रभाग 'संघटक शरद भावे' यांच्या वतीने नाल्यांची पाहणी !!

मनसेच्या रस्ते आस्थापना व साधन सुविधा या विभागाचे घाटकोपर पूर्व - पश्चिमचे प्रभाग 'संघटक शरद भावे' यांच्या वतीने नाल्यांची पाहणी !!

पावसाळ्या पूर्वी डोंगर भागातील नाले सफाई पूर्ण करा पालिकेच्या एन वॉर्ड विभागाला  इशारा

मुंबई (शांताराम गुडेकर )

             महाराष्ट्र नवनिर्माण सेना सलग्न रस्ते आस्थापना व साधन सुविधा या विभागाचे घाटकोपर पूर्व - पश्चिमचे प्रभाग संघटक शरद भावे यांच्यावतीने विभागातील नाल्यांची पाहणी करण्यात आली. महानगर पालिका एन विभागात येणाऱ्या डोंगर भागातील नाले व गटारे पालिकेने पावसाळा पूर्वी साफ करावी अशी मागणी करणारे निवेदन आज पालिकेला देण्यात आले आहे. घाटकोपर पश्चिम हा डोंगराळ भाग असून डोंगर भागातून पावसाळ्यात पाणी दबावाने वाहत असल्याने पार्क साईट तसेच अष्टविनायक सोसायटी येथील काही नाले वेगाने वाहत पाणी घरात शिरल्याच्या घटना अनेकदा यापूर्वी घडल्या आहेत. माता महाकाली मंदिर येथील नाला दरवर्षी पावसाळ्यात भरून वाहत असल्याने कधी -कधी या नाल्याचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने पार्क केलेल्या दुचाकी देखील वाहून गेल्या आहेत.

             घाटकोपर पश्चिम विभागमधील  रामनगर अ, अजिंक्य तारा सोसायटी येथील छोट्या नाल्याची अद्याप साफाई करण्यात आली नसून स्थानिक नागरिक वारंवार दत्तक वस्ती योजना हातलणाऱ्या अधिकाऱ्यांना साफ करून देण्याची मागणी करत आहेत. मात्र जून महिना सुरू झाला असताना देखील नाला साफ न करण्यात आल्याचे येथील स्थानिक नागरिक शंकर परब यांनी बोलताना सांगितले.
              नागरिकांच्या वारंवार येणाऱ्या तक्रारी लक्षात घेत मनसेचे रस्ता आस्थापना विभागाचे प्रभाग संघटक शरद भावे यांनी आज घाटकोपर विभागातील नाले पाहणी केली.अजिंक्य तारा सोसायटीला आज भेट देत या नाल्याची पाहणी त्यांनी केली. यावेळी पालिकेचे संबधित विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधून सदर नाला पावसाळा सुरू होण्यापूर्वी साफ करावा अन्यथा मनसे विशिष्ट पद्धतीने आंदोलन करेल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. पावसाळ्यात घटना घडण्यापूर्वी वेळीच पालिकेने छोटे गटारे, नाले साफ केले तर पुढे प्रसंग घडणार नाही यासाठी मनसेच्या रस्ते आस्थापना विभाग जे जे नाले, गटारे साफ झाले नाही त्याचे फोटो, व्हिडिओ संबधित पालिका अधिकाऱ्यांना पाठवून आम्ही ते साफ करून घेण्याचा प्रयत्न करून मात्र जर अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष्य करण्यात आले तर मनसे पद्धतीने आम्ही आंदोलन करू असे प्रभाग संघटक शरद भावे यांनी बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण पदक जाहीर !

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण...