पत्रकार निलेश मोरे यांची प्रसिद्धी प्रमुख तसेच संघटक प्रमुख पदी नियुक्ती !
मुंबई (शांताराम गुडेकर) :
घाटकोपर येथील आपली माती आपली माणसं या सामाजिक संस्थेच्या प्रसिद्धी प्रमुख व संघटक प्रमुख पदी पत्रकार निलेश मोरे यांची नियुक्ती करण्यात आली असून ही संस्था संपुर्ण महाराष्ट्रात तालुका पातळीवर तळागाळातील जनतेसाठी त्यांच्या सामाजिक न्याय्य हक्कासाठी काम करत आहे. या संस्थेच्या सन २०२३-२४ या वर्षा करीता प्रमुख संघटक पदावर तसेच प्रसिद्ध प्रमुख पदावर संस्थेचे संस्थापक -अध्यक्ष राज पार्टे यांनी पत्रकार निलेश मोरे यांची नियुक्ती केली आहे. त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. तर संस्थेसाठी शक्य तेवढे योगदान देऊन संघटना वाढविण्याचे काम करण्याचा प्रयत्न करेन असे पत्रकार निलेश मोरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
No comments:
Post a Comment