अंगणवाड्यांना खाऊ पुरवणारे बचत गट यांना बंदी तर सेविका यांनी पुरवावा पण लेखी आदेश कुठे? *सोमवारी मोर्चा*
चोपडा, प्रतिनिधी.. अंगणवाड्यांना बालकांना खाऊ पुरवणारे बचत गटांना बंद करून सेविका मदतनीस यांनी पाककृती तयार करून खाऊ पुरवावा अशा तोंडी सूचना एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय जिल्हा परिषद ने दिला आहे. याबाबत बचत गटांना खाऊ पुरवणे बंद करा व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी खाऊ पुरवावा असा लेखी आदेश दिलेला नाही .त्यामुळे यात बचत गटांचा रोजगार बुडत आहे म्हणून त्यांच्यात सरकारविरुद्ध असंतोष तर अंगणवाडी कर्मचाऱ्यात साहित्य अभावी खाऊ पुरावावा कसा ? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.म्हणून यासंदर्भात येत्या सोमवारी पाच जून २०२३ रोजी चोपडा येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा काढण्याच्या निर्णय चोपडा येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीला प्रमुख मार्गदर्शन युनियनचे जिल्हा अध्यक्ष का अमृत महाजन व तालुका अध्यक्ष वत्सला पाटील यांनी केले.
याबाबत सविस्तर असे की, महाराष्ट्रातील एक लाख अंगण वाडिनमधील बालकांना सुमारे 70 हजार बचत गट गेल्या 16 /17 वर्षापासून खाऊ पुरवत आहेत .सत्तर हजार बचत गट म्हणजे आठ लाख महिला खाऊ पुरवतात. हे सर्व काम सुरळीत चालू असताना आठ लाख शेतमजूर महिलांचा रोजगार बंद करून पूर्वी प्रमाणे अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी खाऊ पूरवावा .म्हणून महाराष्ट्र राज्य कंजूमर स्टेटस फेडरेशन तर्फे अंगणवाड्यांना प्रत्येक बालका मागे चाळीस ग्राम गव्हाचा चुरा, शिरा बनवण्यासाठी आठ ग्राम साखर, तेल तीन ग्राम, हरभरा उसळीसाठी 24 ग्राम, मुगाची टरफले सहित डागाळलेली डाळ, दहा ग्रॅम ,तांदूळ, 38 ग्राम, मीठ च४ ग्राम, हळद) चटणी २/२ ग्राम अशा जिन्नस पुरवण्यात येत आहेत . या वस्तूंची शिरा , वरण-भात, मिसळ अशी पाककृती बनवून मुलांना खाऊ घालावे. असे गेल्या दोन महिन्यापासून महिला बालकल्याण विभाग जिल्हा परिषद जळगाव कडून सांगण्यात येत आहे .
याबाबतचा पूर्ण तपशील असा की ,या सर्व पाककृती 2006 पूर्वी अंगणवाडी सेविका मदतनीस जसे अंगणवाडीत तयार करत तसेच त्यांनी करावयाचे आहे. पण गेल्या 16/ 17 वर्षात अंगणवाड्यांना साहित्य नाही पाण्याच्या पिंप नाहीत धान्याच्या कोठ्या खराब झाले आहेत.त्यातच शिवाय गव्हाच्या चुरा, तांदूळ मग डाळ हरभरा यांना पावसाळ्यात किडे.. जाळ लागू शकते. तसेच पुरवलेल्या जिन्नसांची क्वालिटीकडे कूणीच लक्ष दींलेले नाही. पूर्वी आहार चेकिंग साठी बचत गटाकडून आठशे रुपये घेतले जायचे.तशी काहीच यंत्रणाही नाही आणि जिन्नसा मात्र अंगणवाड्याच्या माथी मारण्यात येत आहेत.. सेविका मदतनीस यांना पाककृती शिजवण्यासाठी मोबदला दर लाभार्थी मागे 65 पैसे असा तुटपुंजा निश्चित करण्यात आला . आहे ऑनलाइन कामामुळे आधीच बेजार अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी खाऊ शिजवावा व वाटावा असा लेखी आदेश काही नाही. .त्याचप्रमाणे बचत गटांना अमुक तारखेपासून खाऊ पुरवू नका अशीही ऑर्डर नाही. पूर्वी खाऊ सुरू करताना मात्र ग्रामपंचायतीचे ठराव, करारनामा बचत गटाचा ठराव, बँकेच्या अकाउंट सर्व बंधनकारक चोखपणे होते आणि अलीकडे अचानक बचत गटांना खाऊ बंद करावा असे अंगणवाडी सेविकांना मदतनीस याना गॅस साठवणूक साहित्य न देता त्यांनी खाऊ तयार करावा अशा तऱ्हेचे तोंडी आदेश देणेत येत आहेत. गेल्या सोळा वर्षापासून महाराष्ट्रातील सात लाख महिलांचा रोजगार अशा तऱ्हेने काढून घेतला जात आहे म्हणून याबद्दल अंगणवाडी सेविका मदतनीसन मध्ये कर्तव्य पालन बाबत गोंधळ आणि बचत गटांमध्ये महिलांच्या रोजगार जाणार म्हणून सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण झाला आहे म्हणून याबाबत राज्य शासनाचे ठोस मार्गदर्शन व स्वयंपाकासाठी आवश्यक ती गॅस ओटा, साठवणुकीचे साहित्य पाण्याची सोय ,भांडीकुंडी इत्यादी साहित्य पुरवण्याची मागणी करण्यात येत आहे त्याच्या पाठपुरावा म्हणून येथे येत्या सोमवारी पाच जून २३ रोजी चोपडा तहसीलदार कार्यालयावर सकाळी ११ वा अंगणवाडी सेविका मदतनीस व बचत गटांचा संयुक्त मोर्चा काढण्यात येणार आहे तसा निर्णय या बैठकीत घेण्यात आला बैठकीला सर्व श्रीमती मीराबाई सोनगिरे राधाबाई सोनवणे, सखुबाई पाटील ,कमलबाई कोली, सिंधु सुभाष पाटील ,कुसुम कोळी शारदा पाटील ,अनिता सोनवणे शकुंतला सोनवणे, कविता पवार, अलका पाटील वैशाली सोनवणे आदींच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला..
*आणि याबाबत विशेष म्हणजे गेल्या आठ महिन्यापासून बचत गटांना शासनाने खाऊ शिजवण्याची बिलं दिलेली नाहीत.. असे का अमृत महाजन यांनी सांगितले*
No comments:
Post a Comment