Friday, 9 June 2023

मनसे चित्रपट सेनेच्या उपाध्यक्षपदी राज पार्टे यांची नियुक्ती !!

मनसे चित्रपट सेनेच्या उपाध्यक्षपदी राज पार्टे यांची नियुक्ती !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

              महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या उपाध्यक्षपदी राज पार्टे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती एक वर्षांसाठी असून संघटनेच्या या पदाबाबत ते आपला परफॉर्मन्स दाखवतील त्यानंतर पुढील निवड होणार आहे असे नियुक्तीपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. संघटनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांच्या वतीने देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रात पार्टे यांना त्यांच्या पदाचा कार्य अहवाल पाहून मुदतवाढ निर्णय घेण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. राज पार्टे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या उपाध्यक्ष पदावर त्यांनी काम करून विविध कामगारांना न्याय मिळवून देण्यात त्यांना यश आले आहे. मनसे चित्रपट सेनेच्या उपाध्यक्षपदी राज पार्टे यांची नियुक्ती झाल्याबद्दल अनेकांनी त्यांना अभिनंदनसह शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !!

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !! कल्याण (टिटवाळा), संदीप शेंडगे : मांडा–टिटवाळा (पूर्व) येथील विद्यामंदिर शाळा...