मनसे कामगार सेनेचा सिक्युरिटी प्रायव्हेट कंपनीला दणका !!
*दोन महिन्यात नोकरी देण्याची कंपनीच्या संचालकांची हमी*
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
मुंबईत चांगली नोकरी मिळावी म्हणून अनेक जण प्रयत्न करत असतात. चांगला पगार, चांगल घर हे मुंबईतल्या प्रत्येक मराठी तरुणाच स्वप्न असत. कधी कधी नोकरी मिळेल या अपेक्षेत महिने लोटतात तेव्हा मात्र आपल्याला नोकरी मिळेल का असा प्रश्न उभा राहतो. कल्याण येथील ग्लोबल ग्लॅडीएटर्स सिक्युरिटी प्रा लि या कंपनीत सुरक्षा रक्षक करिता अर्ज करणाऱ्या १०४ तरुणांनी नोकरी करता अर्ज करून ९ महिने उलटून देखील नोकरी मिळत नसल्याने युवकांनी मनसेच्या कामगार सेनेकडे मदत मागितली.
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्ट मंडळाने कंपनीच्या अधिकाऱ्यांना घाटकोपर येथे बोलावून घेत युवकांच्या नोकरीच्या तक्रारी बाबत चर्चा केली यावेळी युवकांना केवळ तारीख पे तारीख देणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना मनसे भाषेत समजावत तरुणांना लवकरात लवकर नोकरीवर घ्या, महाराष्ट्रात मराठी तरुणांवर अन्याय झालेला मनसे खपवून घेणार नाही असा सज्जड दम देखील मनसेने अधिकाऱ्यांना देताच. ग्लोबल ग्लॅडीएटर्स सिक्युरिटी प्रा लि या कंपनीचे संचालक डॉ अभिजित शिंदे यांनी अर्जाची प्रोसेस पूर्ण होत आली असून येत्या दोन महिन्यात सर्व तरुणांना नोकरी मिळेल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
काय आहे नेमक प्रकरण
--------------------------------
सुरक्षा रक्षक तसेच सुरक्षा पर्यवेक्षक करिता शहरातून तसेच उपनगरातील १०४ तरुणांनी अर्ज केले. परफेक्ट प्रोटेक्शन सिक्युरिटी कंपनीत ऑक्टोबर मध्ये अर्ज भरून तसेच युवकांची ट्रेनिंग घेतली यावेळी कंपनीने लागणारे सर्व कागद पत्र जमा केले. ही कंपनी तीन महिन्यात बंद करून ग्लोबल ग्लॅडीएटर्स सिक्युरिटी प्रा लि या नावाने कंपनी सुरू करण्यात आली. या कंपनीने पुन्हा अर्ज करणाऱ्या तरुणांकडून मार्क लिस्ट मागवत ट्रेनिंग सुरू केली. या ट्रेनिंग मध्ये अनेक तरुण पास देखील झाले मात्र इरकॉन या केंद्र शासंनाच्या कंपनीच्या विविध प्रकल्प सुरक्षा रक्षक करिता ट्रेनिंग मध्ये पास व्हावे लागेल तेच सुरुवातीला ३ महिने नोकरी पाहून पुढे कायम नोकरीवर ठेवायचे हा निर्णय कंपनी घेईल असा प्रकारचे मॅसेज आल्या नंतर अखेर अर्ज करणाऱ्या युवकांनी नोकरी करीत मनसेकडे आपली व्यथा मंडळी यावेळी कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली तसेच महाराष्ट्रात मराठी तरुणांवर अन्याय झालेला आम्ही खपवून घेणार नाही असा सज्जड दम दिला यावेळी कंपनीच्या संचालकांनी दोन महिन्यात आम्ही तरुणांना नोकरी देऊ असा विश्वास दिला.
-------------------------------------------
प्रतिक्रिया
अभिजित शिंदे ( संचालक , ग्लोबल ग्लॅडीएटर्स प्रा लि ) : अर्जाची सर्व प्रोसेस पूर्ण झाली आहे. युवकांचे ट्रेनिंग देखील झाले आहे. आम्ही इरकॉन या केंद्र शासन कंपनीच्या विविध प्रकल्प साठी सुरक्षा रक्षक पुरवतो.. या कंपनीचा आम्हाला सात दिवसात कन्फमेशन येणार आहे. त्या नंतर दोन महिन्यात आम्ही या तरुणांना नोकरीवर ठेवू
--------------------------------------------
शुभम शिंदे ( नोकरी साठी अर्जदार ) : आम्ही ८ महिने झाले सुरुवातीला परफेक्ट प्रोटेक्ट सिक्युरिटी मध्ये अर्ज केले तिथे आमची ट्रेनिंग झाली. तिथे सुद्धा आज उद्या करत महिने झाले. तीन महिन्या नंतर ती कंपनी बंद करत ग्लोबल ग्लॅडीएटर्स सिक्युरिटी प्रा ली मध्ये आम्ही अर्ज करत आमच्याकडून मार्क लिस्ट जमा केल्या. येथे सुद्धा आमची ट्रेनिंग झाली आम्ही यात पास देखील झालो. मात्र येथे देखील तारीख पे तारीख सुरूच राहिले. आज ९ महिने झाले तरी आम्हाला नोकरी नाही. आम्ही मनसेकडे याबाबत तक्रार केली आज कंपनीने आम्हाला दोन महिन्यात नोकरीवर घेतो असे कळवले आहे. त्याबाबत मनसेचे आम्ही आभार मानले आहे.
No comments:
Post a Comment