कलगी तुरा समाज उन्नती मंडळ समन्वय समितीची महत्वपूर्ण विषयांवर चिपळूण येथे सभेचे आयोजन !
[ मुबंई : उदय दणदणे ]
कलगीतुरा समाज उन्नती मंडळ समन्वय समिती संस्थेच्या वतीने रविवार दिनांक.१६ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता अभय सहस्त्रबुद्धे यांच्या निवासस्थानी, मु.पो.परशुराम ता.चिपळूण जिल्हा.रत्नागिरी येथे समन्वय समितीचे पदाधिकारी आणि सदस्य यांची कार्यकारणी सभा आयोजित करण्यात आली आहे.
मागील सभेचा इतिवृत्तांत वाचन करणे,त्याचबरोबर कलगीतुरा या लोककलेचे संवर्धन आणि जतन व्हावे या साठी विचार विनिमय करून त्यावर उपाय योजना आखणे. तसेच समन्वय समिती मार्फत कार्यक्रमाचे नियोजन करणे, त्याचबरोबर अध्यक्ष परवानगीने येणारे इतर विषय असे सभेपुढील विषय असणार आहेत. तरी सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन कलगी तुरा समाज उन्नती मंडळ समन्वय समितीच्या वतीने अध्यक्ष- अभय सहस्त्रबुद्धे, सरचिटणीस - सुधाकर मास्कर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment