Monday, 3 July 2023

पालघरमधील केमिकल कंपनीला भीषण आग !

पालघरमधील केमिकल कंपनीला भीषण आग !! *दोघेजण गंभीर*


वसई, प्रतिनिधी : पालघरमधील बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर w87 मधील केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत तीन जण गंभीर भाजले असून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईच्या बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आगीची माहिती मिळताच अग्नीशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या कारखान्यात जेव्हा मोठा ब्लास्ट झाला तेव्हा जवळपास सहा ते सात किलोमीटर परिसरामध्ये हादरे बसल्याची माहिती मिळत आहे.

केमिकल कारखान्यांमध्ये टँकर शिरल्यानंतर एका सिक्युरिटी गार्डने स्टो पेटवल्यानं भडका उडून केमिकल टँकरला आग लागून भयंकर स्पोट झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी चार अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल असून त्यांना लागलेली आग रात्री उशिरा आटोक्यात आणली आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...