Monday, 24 July 2023

टिटवाळा इंदिरानगर येथे जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिर संपन्न !

टिटवाळा इंदिरानगर येथे जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिर संपन्न !

कल्याण, प्रतिनिधी‌ : टिटवाळा नजीक असलेल्या इंदिरानगर येथे जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेतर्फे भरवण्यात आलेले मोफत नेत्र तपासणी आणि आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा उपक्रम प्रमुख अजित जाधव यांच्या सहकार्याने संपूर्ण कोकण सह ठाणे जिल्ह्यात नागरिकांच्या सोयीकरिता मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. इंदिरानगर येथे भरवण्यात आलेल्या या शिबिरामध्ये 140 नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. 64 नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले तर 21 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे मोफत करण्यात येणार आहे.

केवळ फोटो काढण्यासाठी शिबिर घेण्यात येत नसून गोरगरीब तळागाळातील लोकांनी आपल्याला झालेल्या रोगावर पूर्ण उपचार घ्यावेत मोठा आजार असल्यास त्या रुग्णाची मोफत शस्त्रक्रिया करून देण्याच्या एकमेव उद्देशाने जिजाऊ संस्था मोफत आरोग्य शिबिरे भरवीत आहे. शिबिर यशस्वी करण्याकरिता तेरणा हॉस्पिटल टीम व महादेव सांबरे रुग्णालय टीम, तसेच समाजसेवक महेंद्र (रवी) शेजुळ, नंदलाल पगारे, गणेश निगम, जिजाऊ संस्थेचे सदस्य संदीप शेंडगे, आमीर बेग, कल्पना पायाळ, दीपमाला साळवे, यांनी मेहनत घेतली.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...