कल्याण येथील "मोहित गायकवाड अट्रोसिटी प्रकरणाचा तपास संथगतीने...
*आरोपींना अटक करण्यास हयगय प्रकरणी जिल्हाधिकारी, ठाणे यांच्या कडे तक्रार*
कल्याण (अण्णा पंडित ) - कल्याण येथील अल्पवयीन अनुसुचीत जातीच्या मुलाची अर्धनग्न धिंड काढून १००/१५० च्या जमावाने मारझोड केल्या प्रकरणी दाखल असलेल्या *ॲट्रॉसिटी* गुन्ह्याचा तपास संथगतीने सुरु असुन गुन्ह्यातील निम्म्याहून जास्त आरोपी अद्यापही अटक करण्यात आलेले नाहीत. पिडीत कुटूंबाला तात्काळ अर्थसहाय्य देवुन त्यांना शासनाने मदत करणे बंधनकारक असतानाही अद्याप त्यांना शासकीय मदत देण्यात आलेली नाही. तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हे जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती चे सन्माननिय सदस्य सचिव आहेत. अध्यक्ष मा. जिल्हाधिकारी ठाणे इत्यादी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी व पिडीत कुटूंबाला तात्काळ भेट देणे आवश्यक असतांना ही त्यांनी भेट देऊन अद्याप घटनेची माहिती घेतलेली नाही.
गंभीर गुन्ह्याचे गांभीर्य नष्ट होउ नये व तपास निपक्षःपाती पणे व्हावा. म्हणून सदर गुन्ह्याचा तपास *विशेष तपास पथक* (Sit) स्थापन करुन करण्यात यावा या बाबत महामोर्चा द्वारे भारतीय सकल समाजाच्या वतीने शासनास या पुर्वीच निवेदन देण्यात आलेले आहे. परंतु त्याचीही दखल शासनाने न घेतल्याने पिडीताची बाजु न्यायालयात मांडणारे "ॲड. जय गायकवाड" आणि "पिडीत गायकवाड" कुटूंबियांनी महाराष्ट्र शासनाचे दिन. ०१ जुन २०११ रोजीच्या उपसचिव गृहविभाग महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकान्वये आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ व दिरंगाई करणा-या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी तक्रार पत्राद्वारे करण्यात आली आहे.
पिडीत कुटूंबाच्या पुनर्वसनाची जबाबदारी शासनाने ताबडतोब घेऊन त्यांना तात्काळ अर्थ सहाय्य द्यावे. आणि इतर विविध विषयांसंदर्भात सकल भारतीय समाजाचे अध्यक्ष शिष्टमंडळाने आज *सुदाम परदेशी* निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हान्यायदंडाधिकारी ठाणे तसेच *समाधान इंगळे* सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, ठाणे यांची भेट घेऊन सदर प्रकरणी चर्चा केली. व त्यांना वरील मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले. जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती, ठाणे सदस्य सचिव तथा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण ठाणे समाधान इंगळे हे प्रत्यक्ष घटनास्थळी व पिडीत कुटूंबाला भेट देऊन केसच्या तपास कार्याचा अहवाल घेणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळास देण्यात आले आहे. जेष्ठ समाजसेवक तथा मा. प्रदेश सरचिटणीस अन्याय अत्याचार निर्मुलन समिती, महाराष्ट्र राज्य *अण्णा पंडित* समाजसेवक *अजय सावंत* न्यायालयीन कामकाज बघणारे *ॲड. रोहित कांबळे* पिडीत व्यक्ति *मोहित गायकवाड* *मानसी गायकवाड* (पिडीत कुटूंबातील सदस्या) समाज सेवक *वाघमारे, कुमार करण धनगर* इत्यादी मान्यवर शिष्टमंडळात सहभागी होते.
No comments:
Post a Comment