श्री गणेशनाथ महाराज संस्थान तर्फे श्री गुरुपौर्णिमा महोत्सव !
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
श्री गणेशनाथ महाराज संस्थान ट्रस्टच्या वतीने आज गुरू पौर्णिमा निमित्त सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत हरिपाठ , भजन सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्वामी श्री अरविंदनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली लालबाग येथील हनुमान थियेटर मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी गुरुकुल श्री क्षेत्र शेंदूर मलई दत्ताश्रमातील श्री गुरुदेवांच्या निर्गुण पादुका व श्री समर्थ रामदास स्वामींच्या पंढरीची वारी करून आलेल्या पादुका देखील दर्शनासाठी ठेवण्यात आल्या. यावेळी सकाळी 7 ते 9 श्री च्या पादुकांवर अभिषेक करण्यात आला. सकाळी 9 ते 10 श्री च्या पादुकांची मंगल प्रदक्षिणा व मंदिर भेट , सकाळी 10 ते 12 संवाद बैठक घेण्यात आली तर रात्री 8 वाजता दर्शन व अखंड अभंग गायन कार्यक्रम पार पडला. यावेळी महाड पोलादपूर माणगाव चे शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी गुरू पौर्णिमा निमित्त आज सद्गुरु श्री अरविंदनाथ महाराज यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा देत आशीर्वाद घेतले.
No comments:
Post a Comment