अजित पवारासह शपथ घेतलेल्या ८ आमदारांवर अपात्रतेची कारवाई होण्याचे जयंत पाटीलानी दीले संकेत !!
*श्री.जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्ष नेते पदी निवड*
भिवंडी, दिं,३,अरुण पाटील (कोपर)
काल महाऱाष्ट्राच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या ८ आमदारांनी शपथ घेतली. शपथ घेतल्या नंतर आम्हाला माहीत झालं. त्याच क्षनी ते अपात्र ठरले. त्यामूळे अपात्रतेची याचिका महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांकडे काही वेळेआधी आम्ही इमेलद्वारे पाठवली असल्याची माहिती जयंत पाटील यांनी रात्री उशिरा घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली .तसेच श्री.जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्ष नेते पदी निवड झाल्याचे पत्र प्रदेश अध्यक्ष श्री.जयंत पाटील यांनी काढले आहे.
विधानसभा अध्यक्षांना फोन केला, त्यांनी उचलला नाही. त्यांना मेसेज केलाय. व्हॉट्सअॅपवरही कॉपी पाठवली आहे. अपात्रतेची याचिका प्रत्यक्ष देण्याची व्यवस्था केली आहे.निवडणूक आयोगालाही आम्ही पत्र लिहिलं आहे. पत्राद्वारे सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांची कृती मान्य नाही. पक्ष ताबा घेण्याचे सांगेल पण आम्ही आहोत. राष्ट्रवादी अस्तित्वात आहे असं आधीच सांगितलं आहे.
शिस्तपालन समितीलाही पत्र लिहिलं होतं. त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात सांगितलं. आम्ही त्यानुसार नोटीस पाठवली आहे. विधानसभा अध्यक्षांनी उद्या ( दीं,३) सकाळी लवकर आम्हाला सुनावणीसाठी बोलावलं पाहिजे. ज्या ९ सदस्यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन शपथ घेतली. त्यांच्या विरोधात आम्ही अपात्रतेची याचिका दाखल केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांना व्हीपचा अधिकार दिला आहे. त्यांचा व्हीप सर्वांना लागू असेल. ते स्वतः विधासभा अध्यक्षांकडे प्रत्यक्षपणे अपात्रतेची याचिका देण्याचा प्रयत्न असेल. पक्षविरोधी कृती ज्या क्षणी पवार आणि प्रदेशाध्यक्ष अर्थात मला कोणतीही कल्पना न देता कृती केली आहे. आमच्या धोरणां विरोधात जाऊन त्यांनी शपथ घेतली. ज्या क्षणी शपथ घेतली त्या क्षणी ते अपात्र ठरले आहेत.
शपथ विधीसाठी गेलेल्या अनेक आमदारांनी माहीत नसतानाही सह्या केल्या आहेत.ते आमच्या संपर्कात आहेत. आम्ही श्री .शरद पवार यांच्या सोबत असल्याचे त्यांनी फोनवरून कळविले आहे.त्या सर्वांना परत यायचंय त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करत नाही. त्यांना थोडा वेळ देऊ. त्यांना काहीच माहीत नाही. कोणत्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या याची कल्पना नाही. शरद पवार हे उद्या (दीं,३) रोजी साताऱ्याला जात आहेत. तेथून ते महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात करतील. ते पुन्हा योद्धा म्हणून जनतेसमोर जात आहेत.
No comments:
Post a Comment