विभागातील मुलांना पावसाळी रेनकोट वाटप !
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
दादा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थे मार्फत घाटकोपर पश्चिम विभागातील मुलांना पावसाळी रेनकोटचे मोफत वाटप करण्यात आले. पश्चिम भीमनगर परिसरात राहणाऱ्या एकूण ५०० मुलांना यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू पवार यांच्या हस्ते हे रेनकोट वाटप करण्यात आले. दादा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने मुंबई उपनगरसह राज्यात आदिवासी भागात गरजू तसेच अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य तसेच वस्तू वाटप करण्यात येते. कोरोनाच्या महामारीत देखील या प्रतिष्ठानने रस्त्यावरील तसेच फूटपाथवर गुजराण करणाऱ्यांना महिनाभराचे राशन किट, औषधे सलग चार महिने वाटप करण्यात येत होते.
No comments:
Post a Comment