Saturday 16 September 2023

शिवसेना ठाणे जिल्ह्याच्या वतीने श्री गणेश दर्शन स्पर्धा - 2023 चे आयोजन !!

शिवसेना ठाणे जिल्ह्याच्या वतीने श्री गणेश दर्शन स्पर्धा - 2023 चे आयोजन !!



ठाणे , प्रतिनिधी : धर्मवीर आनंद दिघे यांची परंपरा कायम राखत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाही शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्यावतीने श्री गणेश दर्शन स्पर्धा 2023 आयोजित केली असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी नमूद केले.



धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या या अभिनव स्पर्धेचे 31 वे वर्षे असून त्यांच्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा आजतागायत अखंडीत चालू ठेवली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांच्या उत्साहाला विधायक वळण मिळावे व त्यातून समाजप्रबोधनाचे, हिंदुत्वाचे व राष्ट्रीयत्वाच्या भावना वाढीस लागाव्यात या हेतूनेच या स्पर्धेचे आयेाजन गेले 31 वर्षे केले जात आहे. तसेच देण्यात येणाऱ्या पारितोषिकाच्या माध्यमातून मंडळांना हातभार लावण्याचा हा हेतू असून यंदा या स्पर्धेसाठी भरघोस पारितोषिके ठेवण्यात आली आहे. भरघोस रकमेची पारितोषिके देणारी ही महाराष्ट्रातील पहिली स्पर्धा आहे असेही नरेश म्हस्के यांनी नमूद केले.

श्री गणेश दर्शन स्पर्धा ठाणे जिल्ह्यापुरतीच मर्यादित आहे. या स्पर्धेत ठाणे शहरासाठी प्रथम पारितोषिक रु. 1,00,000, द्वितीय पारितोषिक रु. 75,000 स्मृतीचिन्ह, तृतीय पारितोषिक रु. 50,000, चतुर्थ पारितोषिक रु. 25,000 ,पाचवे पारितोषिक रु. 21,000, क्र. 6 ते 10 पर्यत पारितोषिके रु. 15,000 ची पारितोषिके व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. तर तीन विशेष पारितोषिके असून त्यांना रु. 10,000 व स्मृतीचिन्ह, उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास रु. 10,000 व स्मृतीचिन्ह, उत्कृष्ट मूर्तीकार (2) रु. 10,000 व स्मृतीचिन्ह तर उत्तेजनार्थ पारितोषिके 15 असून रु. 10,000 व स्मृतीचिन्ह ठेवण्यात आले आहे. तर आदर्श विसर्जन मिरवूणक काढणाऱ्या मंडळास रु. 21000 व स्मृतीचिन्ह व उत्कृष्ट सजावटकारास रु. 10,000 व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात येईल.

कल्याण शहर (सजावटीसाठी) प्रथम पारितोषिक रु. 25,000, द्वितीय पारितोषिक रु. 21,000, तृतीय पारितोषिक रु. 15,000, उत्तेजनार्थ पारितोषिक रु. 10,000 व स्मृतीचिन्ह ठेवण्यात आले आहे. (उत्कृष्ट मुर्तीसाठी) प्रथम पारितोषिक रु. 11,000, द्वितीय पारितोषिक रु. 7500 , तृतीय पारितोषिक रु. 5000 व स्मृतीचिन्ह, उत्तेजनार्थ पारितोषिक रु. 5000 व स्मृतीचिन्ह ठेवण्यात आले आहे.

स्पर्धेसाठी नियम व अटी ठेवण्यात आल्या असून धर्मादय आयुक्त कचेरीत दिनांक 16 सप्टेंबर 2023 पर्यंत नोंदणी केलेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे या स्पर्धेत भाग घेऊ शकतील. ठाणे जिल्ह्यातीलच गणेशोत्सव मंडळे असली पाहिजेत. देखाव्यातून हिंदुत्व, राष्ट्रीयत्व आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव या गोष्टी प्रामुख्याने पाहिल्या जातील. अनंत चतुर्दशीला विसर्जन होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवांना या स्पर्धेत भाग घेता येईल. परीक्षकांनी दिलेला निर्णय अंतिम धरला जाईल व तो सर्वांवर बंधनकारक राहिल. मंडळांची सजावट प्रथम दिवसापासूनच परिपूर्ण असली पाहिजे, परीक्षक मंडळ प्रथम दिवसापासूनच सर्वेक्षण करणार आहेत. तसेच प्रत्येक मंडळाने त्यांच्या उत्सवाच्या ठिकाणी प्रवेशद्वारावर स्पर्धेचा फलक लावणे अनिवार्य आहे.

सर्व नियम व अटी मान्य आहेत असे गृहित धरुनच मंडळाचे प्रवेश अर्ज स्विकारले जातील. स्पर्धेचे प्रवेश अर्ज दिनांक 16 ते 21 सप्टेंबर 2023 या कालावधीत आनंदाश्रम, टेंभीनाका व शिवसेना शाखा किसननगर नं. 2 ठाणे येथे उपलब्ध आहे.

तरी ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशमंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन शिवसेना ठाणे जिल्हा शाखोच्यावतीने जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

उमेश महाराज शेडगे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार प्रदान !!

उमेश महाराज शेडगे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार प्रदान !! मुंबई (शांताराम गुडेकर) :              परमपूज्य श्री समर्थ सद्ग...