Thursday 14 September 2023

मुंबईत प्रवेश महागला ! १ ऑक्टोबर पासून नवीन दरवाढ लागू !!

मुंबईत प्रवेश महागला ! १ ऑक्टोबर पासून नवीन दरवाढ लागू !!

 


मुंबई, प्रतिनिधी : मुंबईतील टोलवर १ ऑक्टोबrर ttt4 नवीन दरवाढ होणार आहे त्यामुळे मुंबईत प्रवेश करणे आता चांगलेच महागले आहे. मुंबईत प्रवेश करतांना या पूर्वी ४० रुपयेyy पथकर द्यावा लागत होता. यात आता वाढ झाली असून आता ४५ रुपये मोजावे लागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळासाठी (एमएसआरडीसी) एमईपी इन्फ्रा6स्ट्रक्चर कंपनी हा पथकर वसूल करते.

मुंबई महापालिका क्षेत्राच्या हद्दीत प्रवेश करण्यासाठी २००२ मध्ये पथकर नाके उभारण्यात आले होते. हे नाके सायन-पनवेल मार्गावर वाशी येथे, ऐरोली-मुलुंड मार्गावर ऐरोली येथे, तर पश्चिम द्रुतगती मार्गावर दहिसर येथे उभारण्यात आले आहे. तर ठाणे शहरातून मुलुंड येथे जातांना दोन पथकर नाके आहेत. दर तीन वर्षांनी पथकराचे दर वाढवले जातात. चारचाकी, मिनी बस, ट्रक व अवजड वाहने या साठी वेगवेगळे दर आहेत.

पूर्वी चार चाकी वाहनांसाठी ४० रुपये टोल होता. आता त्यात पाच रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या पूर्वी मिनी बससाठी ६५ रुपये, ट्रकसाठी १३० रुपये व अवजड वाहनासाठी १६० रुपये पथकर द्यावा लागत होता. मागील दर वाढ ही १ ऑक्टोबर २०२०पासून लागू करण्यात आली होती. आता सातवी दरवाढ लागू करण्यात आली असून पुढील तीन वर्षांसाठीचा पथकर १ ऑक्टोबरपासून अनुक्रमे ४५ रुपये, ७५ रुपये, १५० रुपये व १९० रुपये द्यावा लागणार आहे. ही दरवाढ २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र चेंबर ऑफ हैसिंग इंडस्ट्रीज कल्याण डोंबिवली युनिटची १४वी वार्षिक सर्वसाधरण सभा संपन्न !!

महाराष्ट्र चेंबर ऑफ हैसिंग इंडस्ट्रीज कल्याण डोंबिवली युनिटची १४वी वार्षिक सर्वसाधरण सभा संपन्न !! ** कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्...