Wednesday 13 September 2023

सनातन वादापासून मुक्तीसाठीच सत्यशोधक समाजाची स्थापना.. कॉ. अमृत महाजन.

सनातन वादापासून मुक्तीसाठीच सत्यशोधक समाजाची स्थापना.. कॉ. अमृत महाजन.

                                      कॉम्रेड अमृत महाजन 

चोपडा, प्रतिनिधी... 24 सप्टेंबर 1873 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांचे शिक्षण विषयक कार्य सुरू असताना सनातन वाद्यांचा त्यांना जो अनुभव आला त्या सनातनवादापासून शूद्र/अति शूद्र समाजाची म्हणजेच बहुजनांची मुक्तता व्हावी म्हणून त्यांनी सत्यशोधक समाजाचे निर्मिती केली व देवाच्या भेटीला जाताना मध्यस्थ नाकारला. सारे क्रिया कर्म आपल्या सत्यशोधक विधी द्वारे करू शकतो असे त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना झाल्यावर लिहून ठेवले आहेत, त्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेच्या दीडशे व्या वर्धापन दिनी येत्या 24 सप्टेंबर 2023 रोजी नाशिक येथे आयोजित सत्यशोधक समाजाच्या 35 व्या राज्य अधिवेशनात भागीदारी करावी असे आवाहन भाकपचे नेते कॉम्रेड अमृत महाजन यांनी लासुर येथे माळी समाज पंच मढी मध्ये आयोजित कार्यकर्ता  बैठकीत केले.. त्यावेळी सत्यशोधक समाजाचे प्रसिद्धी सचिव तथा समन्वयक श्री विजय लुल्ले यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याची महती सांगून सत्यशोधक समाजाचे उद्दिष्ट पटवून सांगितले. बैठकीत अधिवेशनासाठी लासूरकरांनी मदत गोळा करून दिली. 

बैठकीचे अध्यक्ष स्थानी लासूर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री शंकर महाजन होते. श्री संत सावता माळी युवक संघाचे राज्य अध्यक्ष श्री जितेंद्र महाजन यांनी प्रास्ताविक केले.. या  बैठकीला ग्रामपंचायत सदस्य सुरेश माळी, हिम्मतराव माळी,  गोविंद दगा माळी, नारायण पवार सर, सुरेश पवार, सुरेश मगरे, योगेश्वर माळी, नंदलाल माळी, प्रवीण मगरे, शिवदास मगरे, साखरलाल माळी, राजेंद्र महाजन भास्कर महाजन जीभाऊ टेलर आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र चेंबर ऑफ हैसिंग इंडस्ट्रीज कल्याण डोंबिवली युनिटची १४वी वार्षिक सर्वसाधरण सभा संपन्न !!

महाराष्ट्र चेंबर ऑफ हैसिंग इंडस्ट्रीज कल्याण डोंबिवली युनिटची १४वी वार्षिक सर्वसाधरण सभा संपन्न !! ** कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्...