Thursday 21 September 2023

लाखो रुपये खर्च करूनही विसर्जनाच्या गणेशघाटाची दुरावस्था, तर गावागावामधील विसर्जन वाट बिकट !विसर्जनावर विघ्न ?

लाखो रुपये खर्च करूनही विसर्जनाच्या गणेशघाटाची दुरावस्था, तर गावागावामधील विसर्जन वाट बिकट !विसर्जनावर विघ्न ?

कल्याण, (संजय कांबळे) : आमदार, खासदार, तिर्थक्षेत्र विकास आदी निधीतून लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले गणेश घाटांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे तर कल्याण तालुक्यातील गावागावांतील अंतर्गत रस्ते, मुख्य रस्त्यावर खड्डे असल्याने गणेश भक्तांची विसर्जन वाट बिकट होणार आहे.

ठाणे जिल्ह्यासह कल्याण, मुरबाड, शहापूर, भिंवडी आदी तालुक्यात सार्वजनिक तसेच घरगुती गणेशोत्सव व गौरी पूजन मोठ्या प्रमाणात होते, आज पांरपारिक पद्धतीने गावात गौराईचे आगमन होत असते. त्यामुळे या महोत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊन आमदार, खासदार, तिर्थक्षेत्र स्थळांना भरघोस निधी उपलब्ध करून देतात, कल्याण तालुक्यातील सिध्देश्वर मंदिर, शहापूर मधील गंगा गोरेश्वर मंदिर मढ,किन्हवली संगम, यासह उल्हास, बारवी, काळू, आणि भातसा नदीच्या काठावर गणेश घाट बांधण्यासाठी निधी दिला आहे. बहुतांश ठिकाणी ते बांधण्यात आले आहेत. उल्हासनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार कुमार आयलानी यांनी स्थानिक आमदार निधीतून अँटेलिया विसर्जन घाट सुशोभीकरण करणे साठी सुमारे ८०/९० लाखांचा खर्च  केला हे काम ४/५ महिन्यात पूर्वी केले होते, परंतु सध्या याची अवस्था पाहता हा निधी उल्हास नदीत वाहून गेला अशा शंका व्यक्त केली जात आहे, शिवाय इतके करुनही या घाटावर जाण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना व जनतेला परवानगी नाही, त्यामुळे हा निधी कोणासाठी व कशासाठी येथे खर्च करण्यात आला हे समजायला मार्ग नाही. याठिकाणी जाण्यासाठी खाजगी बिल्डर ने गेट लावले असून तेथे त्यांचे सुरक्षाव्यवस्था तैनात केली आहे.

पाचवामैल येथील गणेश घाटाच्या लाद्या तुटलेल्या, उखडलेल्या फुटलेल्या आहेत, रायते येथील नदी किनारी चिखल माती गवत यामुळे याठिकाणी रस्ता निसरडा बनला आहे, नदीच्या पाण्यात ब-यापैकी वाढ होत असल्याने गणेश भक्तांना काळजी घ्यावी लागणार आहे.

तर कल्याण तालुक्यातील रायते मानिवली, मानिवली ते नदीचा घाट, संतेचा पाडा, घोटसई, मांडा, टिटवाळा ते वासुर्दी नदी, सागोडा, वासुर्दी ते निंबवली, खडवली, फळेगाव, आदी गावातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे आहेत, कल्याण मुरबाड मार्गावर म्हारळपाडा ते पाचवामैल रस्ता अद्याप अर्धवट आहे, शहाड उड्डाणपूलावर खड्डे आहेत, अशाच खड्यातून दिड दिवसांच्या गणपती चे विसर्जन झाले, आता गौरी गणपतीचे देखील अशाच खड्यातून विसर्जन होणार असे दिसते. त्यामुळे आमदार, खासदार यांनी दिलेल्या निधीतून कोणाचे भले झाले?गणेश भक्तांना त्रासमुक्त, खड्डे मुक्त सुरक्षित गणेशोत्सव साजरा करता येणार की नाही असा प्रश्न म्हारळ येथील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र मिश्रा यांनी उपस्थित केला आहे.

No comments:

Post a Comment

गुरुपुत्र गुरुवर्य उमेश महाराज शेडगे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार !

गुरुपुत्र गुरुवर्य उमेश महाराज शेडगे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार ! मुंबई (शांताराम गुडेकर) :            परमपूज्य श्री स...