Thursday 21 September 2023

श्री साई बाबा मंदिराचा कलशाला आतूनही सुवर्ण मुलामा, हैदराबादचे विजय कुमार यांनी पुन्हा दीले भरीव सुवर्णदान !!

श्री साई बाबा मंदिराचा कलशाला आतूनही सुवर्ण मुलामा, हैदराबादचे विजय कुमार यांनी पुन्हा दीले भरीव सुवर्णदान !!

भिवंडी, दिं,२१,अरुण पाटील(कोपर)
             शिर्डीच्या श्री साईबाबा मंदिराच्या कलशाला सुवर्णमय करणाऱ्या हैदराबाद येथील साईभक्तानं आता पुन्हा कलशाच्या आतील बाजूलाही सुवर्ण मुलामा दिला आहे. हैदराबाद येथील विजय कुमार या साईभक्तानं या आधीही श्री साईमंदिराच्या कलशा सह मंदिर परिसरातील सर्व मंदिराचे कलश सुवर्ण लेपन केले होते. त्यांनी आता पुन्हा मंदिराच्या कलशाच्या आतील बाजूला सुवर्ण मुलामा करत आपली अनोखी भक्ती श्री साई चरणी अर्पण केली आहे.
           शिर्डीच्या श्री साई बाबांचे देश विदेशात लाखो भक्त आहेत. प्रत्येक भक्त आपआपल्या परीनं श्री साईचरणी दान चढवत असतो. मात्र, श्री साई बाबा मंदिराच्या इतिहासात सुवर्ण कलशासह साईंना सोन्याचे सिंहासन दाक्षिणात्य भाविकांनी दान केले आहे. त्या पैकीच एक भक्त असलेल्या हैदराबाद येथील विजय कुमार यांनी सन २००७  मध्‍ये समाधी मंदिरावरील कळस व त्‍या भोवती असलेले चार गोपूर यांनाही सुवर्ण मुलामा देण्‍याचं काम देणगी स्‍वरुपात केले आहे .यावर आता पुन्‍हा एक थर सुवर्ण वज्रलेप करण्‍याचं कामही करण्‍यात आलंय. याचबरोबर आता विजयकुमार यांनी साई समाधीच्या कलशाच्या आतील बाजूलाही सोन्याचा मुलामा दिला आहे.
           यापूर्वी सन २००६ मध्ये साईबाबांच्या समाधी मंदिरातील सोन्‍याच्‍या पादुका, सोन्‍याची झारी व फुलपात्र, सन २००८  मध्ये सोन्‍याची चिलीम, सन २०१० मध्ये गुरुस्‍थान मं‍दिराच्या बाहेरील बाजूस सुवर्ण मुलामा तसंच सन २०१५ मध्ये साई मंदिर परिसरातील शनि मंदिर, गणपती मंदिर व महादेव मंदिर या तीनही मंदिराच्या कळसांना सुवर्ण मुलामा देण्‍याचं काम देणगीदार विजय कुमार यांचे देणगीतून केले आहे.
         त्याच बरोबरीनं मार्च २०२३ मध्ये साईबाबांचे चावडीतील दोन चांदीचे सिंहासन, नंदादीप, व्‍दारकामाईचे चांदीचे सिंहासन व समाधी मंदिरातील सिंहासन यांना देखील सुवर्ण मुलामा देण्‍याचं काम त्यांच्या देणगीतून झाले आहे, अशी माहिती श्री साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांनी दिली.
          हैदराबाद येथील साईभक्त विजय कुमार यांचा साईमंदिर सुवर्णमय करण्यात मोठा वाटा आहे. श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीनं संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांनी त्यांचा श्री साई बाबांची मूर्ती व विभुती देऊन सत्‍कार केला. दरम्यान देणगीदार साईभक्त विजयकुमार यांनी श्री साई मंदिराच्या कलशाला सुवर्ण मुलामा देण्यासाठी किती खर्च आला, याबाबत बोलण्यास नकार दिलाय. ते म्हणाले की, जे काही आहे ते बाबांचं आहे आणि ते आज बाबांना परत दिलंय.

No comments:

Post a Comment

गुरुपुत्र गुरुवर्य उमेश महाराज शेडगे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार !

गुरुपुत्र गुरुवर्य उमेश महाराज शेडगे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार ! मुंबई (शांताराम गुडेकर) :            परमपूज्य श्री स...