Saturday 16 September 2023

राज्यातील खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसची तपासणी व मनमानी भाडे आकारणी !!

राज्यातील खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसची तपासणी व मनमानी भाडे आकारणी !!

ठाणे, प्रतिनिधी :- शासनाने दि. २७ एप्रिल २०१८ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्य:स्थितीचे भाडेदर विचारात घेवून खाजगी कंत्राटी परवाना वाहनांचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि.मी. भाडे दराच्या ५० टक्के पेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर निश्चित केले आहेत. यापेक्षा जास्त भाडे दर आकारणाऱ्या खाजगी कंत्राटी प्रवासी बस मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ठाणे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंतकुमार पाटील यांनी दिला आहे.

आरटीओने निश्चित केलेले प्रवास मार्गाचे दर (रुपये) :-ठाणे ते महाड - रु 608/-, ठाणे ते खेड -रु.780/-, ठाणे ते चिपळूण - रु. 870/-, ठाणे ते दापोली - रु.780/-, ठाणे ते श्रीवर्धन -रु.623/-, ठाणे ते संगमेश्वर -रु.1050/-, ठाणे ते लांजा -रु.1103/-, ठाणे ते राजापूर-रु.1283/-, ठाणे ते रत्नागिरी-रु.1140/-, ठाणे ते देवगड -रु.1530/-, ठाणे ते गणपतीपुळे-रु.1193/-, ठाणे ते कणकवली-रु.1440/-, ठाणे ते कुडाळ-रु.1583/-, ठाणे ते सावंतवाडी-रु.1620/-, ठाणे ते मालवण-रु.1440/-, ठाणे ते जयगड-रु.1065/-, ठाणे ते विजयदुर्ग-रु.1568/-, ठाणे ते मलकापूर-रु.1583/-, ठाणे ते पाचल-रु.1260/-, ठाणे ते गगनबावडा-रु.1478/- व ठाणे ते साखरपा -रु.1125.

प्रवाशांना प्रवास करताना येणाऱ्या अडचणीबाबत no.04-mh@gmail.com या ई-मेल आयडीवर तक्रार नोंदवावी. त्यानुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे अंतर्गत असलेल्या वायुवेग पथकांमार्फत शासनाने विहित केलेल्या कमाल भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसवर मोटार वाहन कायदा १९८८, CMVR १९८९, MMVR १९८९ च्या प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे ठाणे उप प्रादेशिक प्ररिवहन अधिकारी जयंतकुमार पाटील यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

उमेश महाराज शेडगे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार प्रदान !!

उमेश महाराज शेडगे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार प्रदान !! मुंबई (शांताराम गुडेकर) :              परमपूज्य श्री समर्थ सद्ग...