Saturday 16 September 2023

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वागळे इस्टेट येथे दीक्षांत समारंभ व “PM SKILL RUN” मॅरेथॉन स्पर्धेची संपन्न !!

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वागळे इस्टेट येथे दीक्षांत समारंभ व “PM SKILL RUN” मॅरेथॉन स्पर्धेची संपन्न !!

ठाणे, प्रतिनिधी :- दिनांक १७ सप्टेंबर २०२३ रोजी विश्वकर्मा जयंती चे निमित्ताने शिल्प कारागिर प्रशिक्षण योजनेतंर्गत अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै-२०२३ चा दि.१३ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर झालेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ठाणे यांच्या निकालामध्ये जे उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत त्यांना अंतिम प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम "दीक्षांत समारंभ" दि. १७ सप्टेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाकरिता ASB International Ltd Company, Ambarnath चे संचालक श्री. एम. वी. राव तसेच Ashida Electronics Pvt. Ltd., Wagle Estate, Thane च्या श्रीमती. मानसी कुलकर्णी यांची या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमात प्रत्येक व्यवसायात प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा मेडल व अंतिम प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. तसेच जे विद्यार्थी पूर्ण संस्थेतून प्रथम, द्वितीय व तृतीय आले त्यांना विशेष करंडक देऊन योग्य तो सन्मान करण्यात आला. तसेच "PM SKILL RUN" मॅरेथॉन स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय (पुरुष व महिला) विजेत्या स्पर्धेकांना रोख बक्षीस रक्कम अनुक्रमे रुपये ३ हजार, २ हजार  व १ हजार देण्यात आली व सोबत प्रमाणपत्र मंडळ देण्यात आले.

शेवटी सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या, असे संस्थेच्या प्राचार्या श्रीमती. स्मिता सु. माने यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

उमेश महाराज शेडगे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार प्रदान !!

उमेश महाराज शेडगे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार प्रदान !! मुंबई (शांताराम गुडेकर) :              परमपूज्य श्री समर्थ सद्ग...