Sunday 17 September 2023

ज्ञानविकास नाईट हायस्कूल सायन, मुंबई येथे 'गुरुजन ऋणानुबंध' सोहळा संपन्न !!

ज्ञानविकास नाईट हायस्कूल सायन, मुंबई येथे 'गुरुजन ऋणानुबंध' सोहळा संपन्न !!

मुंबई, प्रतिनिधी - 'ज्ञानविकास नाईट हायस्कुल' सायन (पुर्व) येथील शाळेमध्ये वर्ष २०२१-२०२२ आणि वर्ष २०२२-२०२३ दरम्यान दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांकडून शिक्षणाची दिशा भरकटलेल्यांना उच्च श्रेणी मध्ये उत्तीर्ण करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या गुरुजनांचा सन्मान म्हणून शनिवार दि. १६ सप्टें. २०२३ रोजी *'ऋणानुबंध सोहळा'* आयोजित करण्यात आला.

सादर सोहळ्यात 'ज्ञानविकास नाईट हायस्कुल' चे मुख्याध्यापक परदेशी सर, नव्याने बदली होऊन आलेले सुर्यवंशी सर, वाघ सर, पाटील सर यांच्यासह मुंबई च्या सर्व रात्रशाळेला भक्कम पाठबळ देणा-या मासूम संस्थाचे प्रतिनिधी सुरवसे सर, विकास सर तसेच, समाजसेविका दक्षा कोळी आणि ब्राईट फ्युचर संस्थेच्या अश्विनी मॅडम  यांच्यासह ह्या वर्षातील वर्ष २०२३-२०२४ दरम्यान शिक्षण घेत असलेले इयत्ता आठवी, नववी आणि दहावी चे विद्यार्थी उपस्थितीत होते.

बदली होऊन दुस-या शाळेत गेलेले माजी शिक्षक फडतरे सर यांनी पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना संबोधन केले. सतिश नागमुडे सर यांनी विद्यार्थी घडवित असताना होणारे मजेदार किस्से सांगत सर्वांना खदखदून हसवितानाच जीवनाचे वास्तविकता समोर मांडत विद्यार्थ्यांना मौल्यवान सल्ला दिला तर केंद्रे मॅडम यांनी शाळेबरोबरचा आपला सहवास सांगताना गहिवरून गेल्या. 

त्यानंतर प्रत्येक माजी विद्यार्थी प्रतिनिधींनी आपापले अनुभव सांगताना शाळेत प्रवेश घेण्याआधी, परिक्षा देण्यापर्यंत आणि नंतर उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर झालेला विचारांचा बदलाचा अनुभव व्यक्त करत होते.

मासूम संस्थेचे प्रतिनिधी  विकास सर यांनी आजीमाजी विद्यार्थ्यांना संबोधन करताना शाळेप्रती कर्तव्याची जाणिव करुन देत शिक्षणापासून वंचित असलेल्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करून सामाजिक दायित्व अवलंबून ज्ञानविकास नाईट हायस्कुल मध्ये अधिकाधिक पटसंख्या वाढविण्याची गुरु दक्षिणा म्हणून शाळेसाठी द्यावे, असा संदेश दिला. 

त्यानंतर पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ संस्थेकडून विशेष शैक्षणिक कार्यासाठी निवड झालेल्या माजी शिक्षक फडतरे सर, सतिश नागमुडे सर आणि कामिनी केंद्रे मॅडम यांना सन्मान चिन्ह आणि गौरव पत्र देऊन प्रिन्सिपल सरांकडून सन्मानित करण्यात आले तर मासूम संस्थेकडून 'वर्ष २०२२-२०२३' दरम्यान इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी शाळेतून पहिला, दुसरा आणि तिसरा नंबरने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आकर्षक सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र प्रिन्सिपल परदेशी सरांच्या हस्ते  बहाल करण्यात आले.

शेवटी सर्व मान्यवरांचे विद्यार्थ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:

Post a Comment

उमेश महाराज शेडगे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार प्रदान !!

उमेश महाराज शेडगे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार प्रदान !! मुंबई (शांताराम गुडेकर) :              परमपूज्य श्री समर्थ सद्ग...