Friday 8 September 2023

वरप ग्रामपंचायत तर्फे दिव्यांगा निधीचे वाटप, परिसरातून समाधान व्यक्त !!

वरप ग्रामपंचायत तर्फे दिव्यांगा निधीचे वाटप, परिसरातून समाधान व्यक्त !!

कल्याण, (संजय कांबळे) : अंपगासाठी खर्च करण्यात येणारा ५ टक्के अंपग निधीचे वाटप नुकतेच तालुक्यातील वरप ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सरपंच छाया महेंद्र भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. गणेशोत्सवाच्या तोंडावर निधी मिळाल्याने दिव्यांग बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.
कल्याण मुरबाड महामार्गावर तालुक्यातील वरप ग्रामपंचायत वसलेली आहे, उल्हासनगर शहरानजदीक असल्याने येथे झपाट्याने नागरिकरण झाले आहे. त्यामुळे इतर नागरिकांप्रमाणे येथे दिव्यांगाची संख्या देखील वाढली आहे. गावातील सामाजिक कार्यकर्ते नितीन गायकर यांनी अंपगाना निधीचे लवकरात लवकर वाटप व्हावे म्हणून सतत पाठपुरावा केला. याला स्वप्नील भोईर, यांनी ही सहकार्य केले होते. अखेरीस आज वरप ग्रामपंचायत कार्यालयात ५ टक्के अंपग निधीचे वाटप सरपंच छाया महेंद्र भोईर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी उपसरपंच मिना कुर्ले, सदस्यां दिपीका भोईर, रविना भोईर, सदस्य संदिप पावशे, महेश गोंधळे, हनुमंत भोईर, निलेश कडू, डॉ उपाध्याय, ग्रामविकास अधिकारी तानाजी पाखरे, ग्रामपंचायत कर्मचारी व दिव्याग बांधव व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उर्वरित दिव्यांग बांधवांना लवकरच निधीचे वाटप करण्यात येईल असे ग्रामपंचायत कार्यालयातून सांगण्यात आले. तर अगदी गणेशोत्सव जवळ आल्याने निधीचे वाटप करण्यात आल्याने दिव्यांगाना काही त्यांना उपयोगी पडणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी याची मदत होणार असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले व ग्रामपंचायतीचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...