Friday, 15 September 2023

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त PM SKILL RUN कार्यक्रमाचे आयोजन !!

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त PM SKILL RUN कार्यक्रमाचे आयोजन !!

ठाणे, प्रतिनिधी :- पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी  यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार, दि. १७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ७.०० वाजता संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे PM SKILL RUN कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच PM SKILL RUN कार्यक्रम कौशल्य, रोजगार, उद्योजगकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य मार्फत PM SKILL RUN राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने संपूर्ण महाराष्ट्र मधील सर्व शासकीय व अशासकीय शाळा व महाविद्यालयातील वय वर्षे १६ वयोगटावरील सर्व स्त्री व पुरुष गटातील प्रथम तीन क्रमांकांना पारितोषिक देण्यात येणार आहे. वय वर्षे १६ वयोगटावरील सर्व स्त्री व पुरुष PM SKILL RUN कार्यक्रमात सहभाग घेवू शकतात.

सहभाग घेण्याकरिता जवळील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे तेथील समन्वक यांच्याशी संपर्क करुन सर्व उमेदवारांनी नोंदणी करुन घ्यावी. तसेच सहभाग घेतल्यावर उमेदवारांना डिजिटल प्रमाणपत्र त्यांना ई-मेलव्दारे प्राप्त होईल, असे महाराष्ट्र जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागातर्फे कळविले आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...