कल्याण तालुक्यातील वरप कांबा ग्रामपंचायत हद्दीत एकतारीख, एकतास महाश्रमदान मोहीम, कांबा ग्रामपंचायतीकडून वृक्षारोपणही !
कल्याण, (संजय कांबळे) : १५ सप्टेंबर २०२३ ते २ आँक्टोंबर २०२३ या कालावधीत संपूर्ण भारतभर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे, या मोहिमेतंर्गत १ आँक्टोंबर रोजी एक तारीख, एकतास, स्वच्छता ही सेवा महाश्रमदान हा उपक्रम सर्वत्र राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिदंल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील वरप, कांबा ग्रामपंचायत हद्दीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.तसेच आजचे दिवसाचे महत्त्व ओळखून कांबा ग्रामपंचायतीने श्री क्षेत्र सिध्देश्वर मंदिर रस्त्याच्या बाजूला वृक्षारोपण हा कार्यक्रम ही घेतला, त्यामुळे त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. यावेळी पत्रकार संजय कांबळे हेही उपस्थित होते.
कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिदंल यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पंचायत समितीच्या सभागृहात अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक यांची बैठक घेऊन तालुक्यातील ४६ ग्रामपंचायत व ८३ महसुली गावात एक तारीख, एकतास, महाश्रमदान, स्वच्छता ही सेवा मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यानुसार त्यांनी देखील हातात झाडू घेऊन कल्याण पंचायत समिती परिसर स्वच्छ केला. तर तालुक्यातील वरप ग्रामपंचायत हद्दीत असलेला कचरा व रस्ते स्वच्छ करून ही मोहीम यशस्वी केली, यावेळी पर्यवेक्षक म्हारळ जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रायकर सर,सरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचत गटाच्या महिला, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी, बहुसंख्येने उपस्थित होत्या.
तर शेजारच्या कांबा ग्रामपंचायतने पाचवामैल, श्री क्षेत्र सिध्देश्वर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवली, यावेळी कचरा, फ्लास्टिक, गवत, इतर घाण साफ करून परिसर स्वच्छ केला,घंटागाडी भरभरुन कचरा गोळा करण्यात येत होता. यावेळी सिध्देश्वर मंदिर रस्त्याच्या बाजूला वृक्षारोपण ही करण्यात आले, यावेळी कांबा ग्रामपंचायतीच्या सरपंच भारती भगत, सदस्यां वंदना पावशे, पर्यवेक्षक आरोग्य विस्तार अधिकारी, मोहन गायकवाड, पत्रकार संजय कांबळे, कर्मचारी गुरुनाथ बनकरी, उमेश गायकर, बाळाराम बनकरी, विठ्ठल सुरोशे, देवराम पावशे, प्रतिक पावशे, बंटू जोशी, सर्व अंगणवाडी सेविका, सर्व आशा कार्यकारणी, महिला वर्ग, जिप शाळा कांबा शिक्षिका, आदी बहुसंख्येने उपस्थित होते. आजच्या महाश्रमदान मोहिमेच्या अनुशंगाने कांबा ग्रामपंचायतीने वृक्षारोपण केल्याने त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे..
No comments:
Post a Comment