शेतमजुरांनी अंधश्रद्धा जातीयवादी षडयंत्रात न अडकता आपल्या हक्कासाठी एक व्हावे.. कॉम्रेड जे डी ठाकरे
चोपडा, प्रतिनिधी.. शेतमजुरांनी रूढी परंपरा अंधश्रद्धा व जातीय वाद याचे बेद्यात अडकवून घेऊ नये. रक्त हिरवं नसत रक्त भगवं नसतं ते फक्त लाल असतं याचे भान ठेउन एकजूट व संघर्ष करावा तरच आपली पिळवणूक थांबेल. असे प्रतिपादन चोपडा येथे आयोजित लाल बावटा शेतमजूर युनियनच्या 14 व्या जिल्हा अधिवेशनात जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नेते कॉम्रेड जेडी ठाकरे यांनी उद्घाटन पर भाषण करताना केले. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी भारतीय खेत मजदूर युनियन राष्ट्रीय कमिटी सदस्य कामगार नेते कॉ. अमृत महाजन हे होते.
याबाबत सविस्तर असे की, शेतमजूर युनियनच्या राज्य कौन्सिलच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाप्रमाणे चोपडा येथे काल रोजी अमरचंद सभागृहात जिल्हा शेतमजूर युनियनचे 14 वे अधिवेशन घेण्यात आले सुरुवातीला अधिवेशनाचे राज्यसभेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार काँग्रेसला भालेराव यांच्या प्रतिमेला कॉम्रेड कालू कोळी यांनी माल्या अर्पण केले.
या अधिवेशनात गेल्या पाच वर्षाच्या कामाचा अहवाल संघटनेचे कार्याध्यक्ष कॉ. लक्ष्मण शिंदे यांनी मांडला. व सर्व अधिवेशनाचे प्रास्ताविक भाषण काँग्रेस निर्मला शिंदे यांनी केले सुरुवातीला कॉम्रेड कालू कोळी यांनी राज्य शेतमजूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार दिवंगत कॉ. स. णा. भालेराव यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. कॉम्रेड जिजाबाई राणे, यमुनाबाई भिल, सुमन कोळी, माळी खटाबाई, माळी जयदाभिषेक, अंबाबाई सोनवणे, राधाबाई पाटील, विश्वनाथ सपकाळे, गोकुळ कोळी, रंजना माळी, काशिनाथ ठाकरे, सत्तरसिंग बारेला अकरा प्रतिनिधींनी आपली मत व ठराव मांडले..
*मोदी सरकार रेशन व्यवस्था संपवणार*..कॉ. महाजन
अधिवेशनाचे मार्गदर्शक अध्यक्ष कॉ. अमृत महाजन यांनी मोदी सरकार शेतमजुरांचे रेशन वाटप बंद करणार असून उज्वला गॅस ची सबसिडीप्रमाणे तशी रेशन सबीसीडी संपवणार आहे. असा इशारा त्यांनी आपल्या समारोपाचे भाषणात दिला. या अधिवेशनाचे प्रास्ताविक भाषण महिला नेत्या कॉ. श्रीमती निर्मला शिंदे यांनी केले.
या अधिवेशनात जिल्ह्यातील जुने निष्ठावान कार्यकर्ते सर्वश्री बळीराम धीवर, रतिलाल भील, शांताराम पाटील, संतोष कुंभार, सुमनबाई माळी, गुलाब शहा, कौतिक कोळी, सुनिता नेतकर, ठगूबाई भोई आदीं अनेकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आले..
महात्मा गांधी यांचा पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अधिवेशनाला सुरुवात करण्यात आली, अधिवेशनाच्या व्यासपीठाला उमरटी येथील माजी सरपंच व आदिवासी नेते दिवंगत कॉ. वेस्ता पांडू बारेला असे नाव देण्यात आले होते. अधिवेशनात खालील ठराव मंजूर करण्यात आले.
१) घरकुलासाठी ज्यांना जागा नाही त्यांना जागा व पाच लाख रुपये अनुदान द्या.
२) रेशन कार्ड मिळवताना कमी भावाचे धान्य देतो म्हणून काही महाभाग तीन तीन चार चार हजार रुपये घेतात उदा अडावद येथे भ्रष्टाचार होतो आहे तो बंद करा मागेल त्याला रेशन कार्ड द्या.
३) शेतमजुरांच्या बचत गटांना काम द्या फेड्रेकडे दिलेला
४) अंगणवाडीच्या खाऊ परत बचत गटांना मिळावा ई टेंडर रद्द करा.
५) आदिवासींना त्यांच्या वन जमिनीचे सातबारा उतारे द्या.
६) रेशन अंतर्गत धान्य व जीवनावश्यक वस्तू द्या, रोख सबसिडी नको.
७) गॅस थकीत सबसिडी मिळावी
८) संजय गांधी श्रावणबाळ इंदिरा गांधी योजनेचे तीन हजार मानधन मिळावे.
९) केंद्र सरकारचे कमी मिळालेले दोनशे रुपये प्रमाणे मानधन फरकसह मिळावे
१०) अडावद गावात येथे माळीवाळ्यात महिलांसाठी शौचालय उभारा.
असे १० ठराव करण्यात आले शेवटी जळगाव जिल्ह्याच्या कामकाजाच्या दृष्टीने २१ जणांची कार्यकारणी मंजूर करण्यात आली ती अशी__
... अध्यक्षपदी कॉ. लक्ष्मण शिंदे, उपाध्यक्ष कॉ. अमृत महाजन व जे डी ठाकरे, सेक्रेटरी कॉम्रेड वासुदेव कोळी, सहसचिव अंबालाल राजपूत, खजिनदार सरफराज शहा, सदस्य सर्वश्री कॉ. निर्मला शिंदे, जिजाबाई राणे, रंजना महाजन, छगन कोळी हरीश पवार, विजय सोनवणे, कौतिक कोली, सत्तार सिंग पावरा, संजय पारधी कैलास भिल या १७ जणांचा कार्यकारणीत समावेश झाला असून चार जागा नंतर भरण्यात येणार आहेत.
या अधिवेशनाला जळगाव चोपडा अमळनेर तालुक्यातील ९०/९५ कार्यकर्ते पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते संभाजीनगर येथील अधिवेशनासाठी वीस प्रतिनिधी निवडण्यात आले...
No comments:
Post a Comment