कांबा ग्रामपंचायत हद्दीतील कंपन्यांचे दुषित पाणी उल्हास नदीत, नागरिकांंचे आरोग्य धोक्यात !
कल्याण,स(संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील औद्योगिक ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या कांबा ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या विविध कंपन्याचे केमिकल्स युक्त सांडपाणी गेल्या ३/४ दिवसापासून उल्हास नदी सोडले जात असून याकडे सर्वानी सोईस्कर दुर्लक्ष केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे, तर या दुषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य मात्र धोक्यात येवू शकते.
कल्याण तालुक्यातील उल्हास नदी ही जीवनवाहिनी मानली जाते, अगदी कल्याण ग्रामीण, शहर, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, अशा मोठ्या शहरांना देखील या नदीतून पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे ही नदी जीवनवाहिनी ठरली आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या नदीत मोठ्या प्रमाणात दूषित पाणी सोडले जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
तालुक्यातील कांबा ग्रामपंचायत हद्दीत, पेट्रोल पंपांच्या मागे, अगदी नानेपाडा पर्यंत मोठ्या प्रमाणात विविध कंपन्या झाल्या आहेत. यांचे सांडपाणी गावातील स्मशानभूमी शेजारुन जाणाऱ्या नाल्यात सोडले जाते, हा नाला डायरेक्ट उल्हास नदीस मिळत असल्याने हे पाणी नदीत जाते, गेल्या काही महिन्यापासून हे पाणी बंद होते. मात्र ३/४दिवसापासून या कंपन्या चे पाणी नदीत सोडले जात आहे.
गावातील राकेश वाळिंबे यांच्या हे लक्षात आले. मोठ्या प्रमाणात पाणी नदीत जात असून या पाण्याला उग्र वास येत असून त्याचा रंग देखील वेगळा असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान हे काय पहिली वेळ होत नाही अगदी उल्हास नदी उगमापासून कर्जत, बदलापूर, अंबरनाथ आणि पुढे कल्याण अशी प्रदूषित होत आहे, या विरोधात अनेक सामाजिक संघटनानी या विरोधात कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केल्या. परंतु त्यांनी केवळ कागदी घोडे नाचविण्यात धन्यता मानली, नदीचे प्रदूषण काय थांबले नाही. आजही अनेक कंपन्या चे टँकर नदीच्या पात्रात रिकामे केले जातात. मात्र ते अधिका-यांना दिसत नाही, हे असेच राहिले तर मात्र भविष्यात उल्हास नदीचे पाणी पिण्यायोग्य असेल असे वाटत नाही.
याबाबत कांबा ग्रामपंचायतीचे प्रभारी ग्रामविकास अधिकारी तानाजी पाखरे यांना विचारले असता ते म्हणाले, या नाल्यावर नाला ट्रिटमेंट केली आहे, फक्त त्यामध्ये जाळी बसविणे राहिले त्या बसविल्यानंतर दूषित पाणी नदी जाणार नाही, केवळ शुद्ध पाणी च नदीत जाईल, तर याबाबत उज्ज्वल फांऊंडेशन कांबा चे अलबीन सर यांना विचारले असता ते म्हणाले, आम्ही लवकर यामध्ये लक्ष घालणार आहे, स्वच्छ व शुद्ध पाणी प्रत्येक नागरिकांना मिळाले पाहिजे तो त्याचा हक्क व अधिकारी आहे असे त्यांनी मत व्यक्त केले.
No comments:
Post a Comment