Monday, 2 October 2023

1 ऑक्टोबर जागतिक जेष्ठ नागरिक दिनी श्री मधुकर जानू हरणे यांचा 71 वा वाढदिवस उत्साहात साजरा !!

1 ऑक्टोबर जागतिक जेष्ठ नागरिक दिनी श्री मधुकर जानू हरणे यांचा 71 वा वाढदिवस उत्साहात साजरा !! 

ठाणे (जिल्हा प्रतिनिधी), (विश्वनाथ राऊत- उपसंपादक) :
एक ऑक्टोबर जागतिक जेष्ठ नागरिक दिनी श्री मधुकर जानू हरणे यांचा 71 वा वाढदिवस येत असल्यांने त्यांचा वाढदिवस त्यांच्या चार मुलींनी एकत्रित येऊन कल्याण येथील राहत्या घरी मोठ्या आनंदाने साजरा केला. श्री मधुकर हरणे हे मु.  वालकस पोस्ट खडवली ता. कल्याण येथील रहिवासी असून ते एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व आहे. गावच्या सर्वच सुख- दुःखात सहभाग घेत असतात. वयाच्या 71 व्या वर्षीही एखाद्या तरुणाला लाजवेल असे कार्य त्यांच्या हातातून होत असतात. त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यायला हवा. त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सर्वांना प्रत्येकाच्या पायावर उभे केले. त्यांना नोकरी, रोजगार मिळवून दिला. आज त्यांचे कुटुंब एकोप्याने राहत आहेत.

वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या मुली मीना तुंगारे, सपना पवार, ज्योती राऊत, शिल्पा वाडेकर पुढाकार घेऊन वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न केला. या वयात वाढदिवस साजरा करून जेष्ठ नागरिकांना पुढे जगण्याची उमेद निर्माण करून दिली. वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांचे सर्व जावई उपस्थित होते. त्यांचे मेव्हणे पांडुरंग ठाकरे व त्यांच्या परिवाराकडून त्यांना भेट वस्तू देण्यात आली. 

त्यांच्या सर्व  नातवंडांनी त्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला. तसेच सर्व नातेवाईक व मित्र परिवारांकडून व्हाट्सअप, फेसबुक व प्रत्यक्ष भेटून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आश्या सर्वांचे श्री मधुकर हरणे यांनी वाढदिवसा निमित्ताने शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...