Thursday, 11 June 2026

मोहने येथील पाटील बाल मंदिर शाळेचा दहावीचा विद्यार्थी वेदांत मिश्रा बेपत्ता !!

मोहने येथील पाटील बाल मंदिर शाळेचा दहावीचा विद्यार्थी वेदांत मिश्रा बेपत्ता !!

पालकांची आर्त हाक

कल्याण, संदीप शेंडगे : मोहने परिसरातील पाटील बाल मंदिर या शाळेचा विद्यार्थी वेदांत मिश्रा हा आज दुपारी शाळेतून घरी परत येताना बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.वेदांत हा इयत्ता दहावीचा विद्यार्थी असून तो मोहने येथील पाटील शाळेत शिक्षण घेत आहे. दुपारी शाळा सुटल्यानंतर वेदांत घरी परतला नसल्याने कुटुंबीय अत्यंत चिंतेत असून त्याचा सर्वत्र शोध सुरू आहे. वेदांतच्या अंगावर पाटील शाळेचा गणवेश असून, तो शेवटचा शाळेतून घरी येताना दिसला होता. परंतु तो कोठे गेला याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नाही. याबाबत खडकपाडा पोलीस ठाण्याचे गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक राजेश आंधळे तपास करीत असून सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरू आहे तसेच त्याचा शोध घेण्याकरिता राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात संपर्क केल्याचे आंधळे यांनी सांगितले आहे.

आपल्या मुलाच्या शोधासाठी आई-वडील, नातेवाईक आणि मित्रपरिवार हतबल झाले असून नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सतर्क राहून वेदांत दिसल्यास किंवा त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास खालील क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा.
9321265331
96536 77810

No comments:

Post a Comment

खाजगी शिकवणी नियमन मसुदा : शासनाकडून अखेर १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; ११,४१० कायदेशीर हरकतींची नोंद !!

खाजगी शिकवणी नियमन मसुदा : शासनाकडून अखेर १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; ११,४१० कायदेशीर हरकतींची नोंद !! *कोल्हापूर, दि. ७ सप्टेंबर...