नवरात्रोत्सवाच्या निमित्त नालासोपारात रांगोळी स्पर्धेत महिलांचा उत्सुर्फ प्रतिसाद..
वसई, प्रतिनिधी : महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरीता जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने नालासोपारा येथे भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन शहरात करण्यात आले होते. या रांगोळी स्पर्धेमध्ये महिला तसेच युवतींनी तासन तास आपल्या कलेच्या माध्यमातून आकर्षक अशा रांगोळ्या काढल्या
महिलांच्या अंगभूत कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभला.
रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक - मनस्वी महाडीक व्दितीय क्रमांक - स्नेहल मिसाळ तृतीय क्रमांक - तन्वी हडशी, यांनी बक्षिस पटकाविले.
विजेत्यांना जिजाऊ संस्थेचा व शिवसेनेच्या महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. महिला सक्षम झाल्या असुन जीवनाच्या विविध क्षेत्रात समर्थपणे वाटचाल करत आहेत.
घराच्या जबाबदाऱ्या सांभाळत नोकरी, व्यवसाय, राजकारण, समाजकारण क्षेत्रातही यश मिळवत आहेत. महिलांच्या निरनिराळ्या कलांना प्रोत्साहन व हक्काच व्यासपीठ देण्याचे काम जिजाऊ संस्था करत आहे. असे मत शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment