मानिवली पाडा येथील बँण्ड च्या साहित्याची चोरी, आता अशाही साहित्याची होऊ लागली चोरी, संपर्क साधाण्याचे अवाहन !
कल्याण, (संजय कांबळे) : सध्याच्या काळात कशाची चोरी होईल हे काय सांगता येत नाही. कारण बेकारी इतकी वाढली आहे, यात झटपट श्रीमंत होण्याकडे वाढता कल, कष्ट, मेहनत, करण्यात नकार, आदी कारणे समोर येत आहेत. त्यामुळे चोर काय चोरी करतील हे कळायला मार्ग नाही, असाच काहीसा प्रकार कल्याण तालुक्यातील मानिवली पाडा (संतेचा पाडा) येथे उघडकीस आला आहे. येथे चक्क चोरांनी बँड मधील ताशे व सिबाँल चोरून पोबारा केला आहे. त्यामुळे हे साहित्य कोठे कोणी विकायला आला तर आमच्याशी संपर्क साधावा असे अवाहन बँड पथकाच्या तरुणांनी केले आहे.
कल्याण शहराच्या अगदी जवळ उल्हासनगर, हे प्रति मुंबई समजणारे शहर आहे, मुंबई प्रमाणे येथेही कोणी उपाशी मरणार नाही असे म्हटलं जातं. ते खरेही आहे, कारण कल्याण तालुक्यातील, म्हारळ, वरप, कांबा, मानिवली, घोटसई, टिटवाळा, फळेगाव, मामणोली ते अगदी, शहापूर, मुरबाड, आदी ठिकाण्याहून तरुण मंडळी काम धंद्यासाठी उल्हासनगर येथे येत असतात, ते तर काय करणार, हाताशी असणारी शेती जवळपास संपुष्टात आली आहे, अशातच वाढत्या महागाई मुळे ती करणे शक्य नाही,
आजुबाजूला असणाऱ्या कंपन्या, कधीच बंद पडल्या आहेत, त्यामुळे रोजगार नाही, बेकारी वाढली, हाताला काम नाही, राजकारणी निवडणुकीपुरता वापर करून घेतात, अशा एक ना अनेक अडचणी सध्या तरुणापुढे उभ्या आहेत. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी गावा गावातील तरुणांनी बँड पथक तयार केले आहे, गावातील २०/३० तरुणांचा यामध्ये समावेश असतो. साधारण पणे लग्न सराईत, गणपती उत्सव, अशा ३/४ महिन्यात लग्नात बँडला चांगली मागणी असते. यासाठी बँडचे साहित्य कधी कर्ज काढून तर कधी वर्गणी गोळा आणले जाते, ते फेडण्यासाठी हे तरुण दिवसरात्र मेहनत करून, तज्ञ मास्टर कडून सर्व शिकून घेतात, व सर्व परफेक्ट झाल्यानंतर वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या सुपाऱ्या घेतात, यातून सर्वांना चार पैसे मिळतात, यामुळेच कल्याण तालुक्यातील मानिवली पाडा (संतेचा) येथील ३२ तरुणांनी आई एकवीरा ब्रास बँण्ड पथकाची निर्मिती २०१८ मध्ये केली, शहाड येथील मास्टर नरेश कोनकर व अनिल मढवी यांनी यांना प्रशिक्षण दिले, त्यामुळे हे आता स्वतः वाजवू लागले होते, ब्रास बँण्ड साठी लागणारे सर्व साहित्य यांनी आणले व घोटस ई रस्त्याच्या बाजूला शेतावर असलेल्या जगण माळी यांच्या घरात प्राँक्टिस करू लागले.
मात्र काल रात्री घराच्या खिडक्या चे गज कापून घरात प्रवेश करून २ पितळेचे ताशे, २ चाँक सिबाँल, आणि १ सिबाँल चोरट्यांनी चोरून पोबारा केला, याची किंमत साधारणपणे २५/३० हजार असल्याचे या बँण्डचे हेंमत संते यांनी सांगितले. तसेच हे साहित्य कोणी कोणाकडेही विक्री साठी आला तर आई एकवीरा ब्रास बँण्ड पथकाशी संपर्क साधावा असे अवाहन येथील तरुणांनी केले आहे.
सध्या, सोने, चांदी,पैसा, किंवा इतर किंमती साहित्याची चोरी झाल्याचे ऐकले होते, मात्र ब्रास बँण्ड च्या साहित्याची चोरी ही पहिली घटना असावी असे वाटते. पण चोरांची चाँईस कधी बदलेल हे काय सांगता येत नाही, त्यामुळे पोलिसांनी व त्यांच्या सरकारने अशा चोरांना आळा घातला पाहिजे, अन्यथा हे बँण्डवाले व जनता शासनाचे 'बारा,वाजवेल असे मिश्किलपणे म्हटले जात आहे.
No comments:
Post a Comment