साई परिवार सेवा भावी ट्रस्ट कांदिवली मुंबईतर्फे डॉ. कुसुमताई नरवणे कर्णबधीर शाळा (सदाफुली) येथे मुलांना अन्नदान व चॉकलेट वाटप !!
मुंबई (शांताराम गुडेकर /मोहन कदम) :
साई परिवार सेवा भावी ट्रस्ट कांदिवली मुंबई यांच्या कडून समाजकल्याण मान्यताप्राप्त अनुदानित शाळा श्री रामकृष्ण शिक्षण मंडळाची डॉ. कुसुमताई नरवणे कर्णबधीर शाळा (सदाफुली), एम. जी. रोड, कांदिवली (प.) येथे मुलांना अन्नदान व चॉकलेट वाटप करण्यात आले.
साईपरिवार चे सर्वश्री. मंगेश अंकुश रासम, ट्रस्टी अनिल वडके, उमेश मांजरेकर, शरद नाक्ती, प्रशांत पिल्ले, विनोद इंगावले, विनायक सावंत आणि सौ. मनीषा रासम, शाळेचे सर, मुख्याध्यापक, शिक्षक कर्मचारी यांनी ही या कार्यात सहभाग घेतला होता. साई परिवार सेवा भावी ट्रस्ट कांदिवली मुंबई यांच्या या कार्याचे विभागात कौतुक होत असून अनेकांनी त्यांना यानिमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment