ज्येष्ठ साहित्यिक अशोक लोटणकर यांना दादा गावकर सामाजिक प्रतिष्ठान, मुंबईचा साहित्य पुरस्कार जाहीर !!
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
ज्येष्ठ साहित्यिक कवी अशोक लोटणकर यांना दादा गावकर सामाजिक प्रतिष्ठान मुंबई यांचा प्रज्ञावंत दिलिप पायगुडे साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सोहळा दि. ४ नोव्हेंबर २०२३ रोजी भायखळा राणीबाग येथील आण्णा भाऊ साठे नाट्यगृहात मा.ना.श्री. मंगल प्रभात लोढा, कौशल्य विकास, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री , महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या वेळी कुटुंब रंगलय काव्यात चे प्रा. विसुभाऊ बापट यांचे सह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
श्री.लोटणकर यांची कथा, कविता, ललित गद्य, बालवाङमयइ. साहित्य प्रकारातील २० पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. लोटणकर यांना अलिकडेच, कोकण युवा मंच या संस्थेच्या कोकण साहित्य रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते. गेल्या वर्षी सातव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे ते समेलनाध्यक्ष राहिले आहेत. लोटणकर हे बेस्टमधून आगार व्यवस्थापक या पदावरून सेवानिवृत्त झालेले असून ते अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक सस्थांशी संबंधित आहेत. त्यांच्या साहित्यकृतींना कवी कुसुमाग्रज पुरस्कारांसह कोमसाप आणि नामवंत साहित्य संस्थांचे, सामाजिक संस्थांचे २५ हून अधिक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
लोटणकर हे रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा या गावचे भूमिपुत्र आहेत. लोटणकर यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कोकणातील अनेक मंडळ, सामाजिक संस्था, ग्रामस्थ मंडळ, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, वृतपत्रलेखक, बीईएसटी कर्मचारी यांनी त्यांना अभिनंदनसह शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment