Saturday, 21 October 2023

कमवा व शिका या योजनेअंतर्गत CEDP ने सुरु केले अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम !!

कमवा व शिका या योजनेअंतर्गत CEDP ने सुरु केले अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम !!

बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्याचे स्वप्न प्रत्येक विद्यार्थ्यांचे असते. 'हातात पदवी असली की बस्सं', अशा मानसिकतेतून विद्यार्थी आता बाहेर पडले असून, हमखास नोकरीची हमी देणारे किंवा व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांनाच हे विद्यार्थी प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.

त्यामुळे केवळ पदवी मिळविण्यापुरते शिक्षण घेण्यापेक्षा शिक्षणातून नोकरीची हमी मिळायला हवी, याकडे त्यांचा कल आहे. म्हणूनच अशाच अभ्यासक्रमांत प्रवेश घेण्यासाठी हजारो विद्यार्थी 'प्रतीक्षेत'(वेटिंग) असल्याचे दिसून येते.

आज व्यवसायिक अभ्यासक्रम अत्यंत महागले आहेत, अल्प उत्पन्न, मध्यमवर्गीय परिवारातील मुलांना अशा अभ्यासक्रमांना आर्थिक परिस्थिती मुळे वंचित रहावे लागत आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून CEDP इन्स्टीट्यूट यांनी फक्त ११०००/- या नाममात्र फी मध्ये. (सरकारमान्य) UGC मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी चे अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. तसेच यात अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर नोकरीची सुध्दा हमी देतात.

या अभ्यासक्रमा बद्दल माहिती देताना या इन्स्टिट्यूट चे मनिष देसाई यांनी सांगितले - १) BSC नर्सिंग (४२ महिने), २) GNM + GDA/OTT  (४२ महिने), ३) BOVC Banking financial services & Insurance ४) BOVC Auto+ Auto Technician (36 month), ५) BOVC- HR Management (36 month), ६) BOVC- Hotel Management+ commichef/ steward/ Hk/ Aviation (36 month), ७) BOVC Cyber security & Ethical Hacking ८) BOVC - All Data Science, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक, फायनान्स मधील कोर्सेस असे नोकरीची हमी असलेले अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम कुर्ला, ठाणे, डोंबिवली येथे सुरू केले असुन हे सर्व अभ्यासक्रम "कमवा व शिका" या योजनेअंतर्गत फक्त ११०००/- रुपये शुल्क भरून करता येतील. 

या संदर्भातील अधिक माहितीसाठी आपण 981-980-7386, 9819817386 या नंबरवर संपर्क करावा.

No comments:

Post a Comment

छत्रपती संभाजी महाराजांवरील अजिंक्य योद्धा हे दोन अंकी नाटकाचा बुधवार १२ रोजी शुभारंभ !

छत्रपती संभाजी महाराजांवरील अजिंक्य योद्धा हे दोन अंकी नाटकाचा बुधवार १२ रोजी शुभारंभ ! मुंबई, प्रतिनिधी‌ : आत्ताच्या सोशल मिडिय...