आमदार गणपतशेठ गायकवाड यांनी कल्याण पुर्वेतील समस्यांबाबत घेतली आयुक्तांची भेट !!
कल्याण, सचिन बुटाला : कल्याण पुर्वेचे मा. आमदार गणपतशेठ गायकवाड यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त मा. भाऊसाहेब दांडगे (भाप्रसे) यांच्या सोबत झालेल्या बैठकीत मतदारसंघातील (कल्याण-पुर्व) महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करून तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना केल्या.
कल्याण पूर्व येथील १०० फुटी रोड लगत रुग्णालया करिता (आरक्षण क्र. २८३) तसेच क्रीडासंकुला करिता आरक्षण क्र. २७९ आरक्षित जागेवर अद्ययावत रुग्णालय व क्रीडासंकुल उभारण्याकरिता जागा अधिग्रहण करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून यासाठी लागणाऱ्या निधीसाठीचा प्रस्ताव तातडीने राज्यशासनाकडे सादर करणे.
कल्याण पूर्वेतील सर्व मुख्य व उपरस्त्यांची विशेषत: १) चेतना शाळा ते नेवाळी नाका श्री मलंग रस्ता २) गावदेवी मंदिर ते मोर्या नगरी रस्ता ३) काटेमानिवली नाका ते हनुमान नगर, शंकर पावशे रोड ४) चिंचपाडा कमान ते चिंचपाडा गाव या रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करणे.
कल्याण पुर्वेतील विशेषतः चिंचपाडा, आशेळे, माणेरे, द्वारली, नांदिवली व वसार परिसरामधील पाणी समस्या तसेच अमृत योजने अंतर्गत पाण्याची पाईपलाईन टाकणे व जलकुंभ बनविण्याच्या कामात होत असलेल्या अक्षम्य दिरंगाई विषयी_
तिसगाव नाका ते काटेमानिवली नाका या यु टाईप २४ मीटर (८०फूट) रस्त्याच्या कामाबाबत_
कल्याण पूर्वेतील वाढती लोकसंख्या लक्षात घेता प्रभाग क्र.१०० तिसगाव गावठाण, गावदेवी मंदिरा शेजारी जलकुंभ बनविणे.
कल्याण पूर्वेत विशेषतः चिंचपाडा, आशेळे, माणेरे, द्वारली, नांदिवली व वसार येथे पथदिवे बसविणेबाबत_
श्रीमलंग रोड ते चिंचपाडा या १०० फुटी रोड मध्ये बाधित होणाऱ्या माधव अपा. या ईमारती मधील नागरिकांचे पुनर्वसन करणे.
यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. महानगरपालिका आयुक्त मा. भाऊसाहेब दांडगे यांनी मा. आमदार गणपतशेठ गायकवाड यांनी मांडलेल्या समस्यांबाबत सकारात्मक दृष्टिकोन दाखवून लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
No comments:
Post a Comment