Thursday, 19 October 2023

ठाण्यातील टेंभी नाका नवरात्रोत्सवात रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाआरती !!

ठाण्यातील टेंभी नाका नवरात्रोत्सवात रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाआरती !!


ठाणे, प्रतिनिधी : शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख 'धर्मवीर' आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभीनाका येथील अंबेमातेच्या नवरात्रोत्सवाचे यंदाचे 46 वे वर्ष आहे. दरवर्षी ठाकरे कुटुंबीय देवीचे दर्शन घेऊन महाआरती करतात. आज सौ. रश्मी ठाकरे यांनी या देवीचे दर्शन घेतले. त्यांच्या स्वागतासाठी ठाण्याच्या वेशीपासून शिवसैनिक आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

यावेळी शिवसेना नेते-खासदार राजन विचारे, उपनेत्या विशाखा राऊत, ज्योती ठाकरे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, समिधा मोहिते, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, विठ्ठल मोरे, प्रभाकर म्हात्रे, भाईंदरचे जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, माजी नगरसेवक संजय तरे, महेश्वरी तरे, संजय दळवी, मंदार विचारे, प्रशांत सातपुते, उपशहरप्रमुख भास्कर बैरीशेट्टी, प्रवक्ते चिंतामणी कारखानीस, चंद्रभान आझाद, अनिष गाढवे यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

सौ. रश्मी ठाकरे यांच्या स्वागतासाठी संपूर्ण टेंभीनाका प्रचंड गर्दी झाली होती. हे पाहून रश्मी ठाकरे यांचे सभामंडपाजवळ आगमन होताच मंडपातील वीज बंद करण्यात आली. त्यामुळे पंखे, वातानुकूलित यंत्रणा आणि माईकही बंद पडले. अंबेमातेची महाआरती रस्त्यावर ऐकू जाऊ नये यासाठीच हे माईक मिंध्यांच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडल्याचा आरोप महिला आघाडीने केला. 


No comments:

Post a Comment

"सिद्धार्थ महाविद्यालयात रमाबाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती वकृत्व स्पर्धेद्वारे संपन्न "

"सिद्धार्थ महाविद्यालयात रमाबाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती वकृत्व स्पर्धेद्वारे संपन्न " सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त...