कांबा ग्रामपंचायत हद्दीत प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन, मान्यवरांची उपस्थिती !
कल्याण, (संजय कांबळे) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील कुशल भारत घडविण्यासाठी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग तर्फे महाराष्ट्र मध्ये ग्रामीण स्तरावर 511 कौशल्य विकास केंद्र मंजूर केली आहेत. यांचे आँनलाईन उद्घाटन आज कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायत हद्दीत राँयल गार्डन येथे आयोजित करण्यात आले होते, यासाठी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.
राज्यातील ग्रामीण भागातील युवक युवतींना रोजगार क्षेत्रातील उपयुक्त कौशल्य आत्मसात करून तरूणांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्यासाठी सुरू करण्यात येत असलेल्या या ग्रामीण भागातील 511 प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उदघाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले, या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आज गुरुवार, संध्याकाळी ठिकाण - रॉयल गार्डन कल्याण मुरबाड रोड, कांबा ग्रामपंचायत, तालुका कल्याण या ठिकाणीं आयोजित करण्यात आला होते.
यावेळी उल्हासनगर विधानसभा आमदार कुमार आयलानी, कल्याण पुर्व चे आमदार गणपतशेठ गायकवाड, कल्याण तहसीलदार जयराज देशमुख, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, विस्तार अधिकारी विरेंद्र चव्हाण, कांबा ग्रामपंचायत सरपंच भारती भगत, उपसरपंच सोनाली उबाळे, छायाताई बनकरी, इशा भोईर व इतर सदस्य, ग्रामविकास अधिकारी तानाजी पाखरे म्हारळ ग्रामपंचायत सरपंच निलिमा म्हात्रे, बेबीताई सांगळे, कल्याण पंचायत समितीचे माझी उपसभापती पांडुरंग म्हात्रे, याशिवाय
सर्व जिल्हा पदाधिकारी मंडळ अध्यक्ष, आघाडी /सेल प्रमुख, नगरसेवक म्हारल वरप व कांबा ग्रामस्थ तसेच प्रदीप रामचंदानी जिल्हा अध्यक्ष भाजप, जमनू पुरुसस्वानी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आयटी आय चे विद्यार्थी व शिक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. आँनलाईन उद्घाटना अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाषणे झाली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आँनलाईन उद्घाटन केल्यानंतर उपस्थित सर्वांना आँनलाईन मार्गदर्शन केले व कार्यक्रम संपन्न झाला.
No comments:
Post a Comment