कल्याण मधील वाहतूक कोंडीवर अखेर तोडगा ; सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी !
कल्याण, प्रतिनिधी : नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दुर्गाडी येथील वाहतूक बंद करण्यात आली असल्याने गेल्या दोन दिवसांपासून कल्याणकरांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते.
कल्याणकरांना भेडसावणाऱ्या या समस्येची तात्काळ दखल घेत कल्याण पश्चिम चे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केडीएमसी आयुक्त, वाहतूक पोलीस आणि पोलीस प्रशासनाची तातडीची बैठक बोलावली होती. त्यामध्ये सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीत आमदारांनी केलेल्या सुचनेनुसार कल्याण शहरात सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्याच्या महत्त्वाचा निर्णयासह पत्रिपुलापासून ते दुर्गाडी चौकापर्यंत असणाऱ्या क्रॉसिंगवर वाहतूक पोलिसांची संख्या वाढवणे, दुर्गाडी देवीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांसाठी लालचौकी येथील शारदा मंदिर शाळेच्या आणि वासुदेव बळवंत फडके मैदानात पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देणे, या दोन्ही ठिकाणांहून दुर्गाडीसाठी केडीएमटीच्या मोफत बसेस सोडणे, आदी निर्णयही या बैठकीत घेण्यात आले. वाहतूक समस्येची गंभीरता लक्षात घेऊन केलेल्या या उपाय योजनांमुळे कल्याणकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
No comments:
Post a Comment