लायन्स क्लब ऑफ मोहने-टिटवाळा यांच्या प्रयत्नाने आंबिवली स्टेशनचा झाला कायापालट !!
*लायन्स क्लबचे मोहने-टिटवाळा अध्यक्ष दया शेट्टी यांचा पुढाकार*
मोहने, संदीप शेंडगे : लायन्स क्लब ऑफ मोहने टिटवाळा अध्यक्ष दया शेट्टी यांच्या प्रयत्नाने अंबिवली रेल्वे स्थानक चकाचक झाले असून संपूर्ण रेल्वे स्थानकाला रंगरंगोटी केल्याने लाखो प्रवाशांचे आंबिवली स्थानक लक्ष वेधून घेत आहे.
मध्य रेल्वेच्या कल्याण कसारा मार्गावरील आंबिवली स्टेशन हे अतिशय गलिच्छ आणि अस्वच्छ स्टेशन म्हणून ओळखले जात होते. बल्यानी गाळेगाव जेतवन नगर महात्मा फुले नगर मोहने गावठाण अटाळी आंबिवली शिवसृष्टी आदी परिसरातील जवळजवळ एक लाख प्रवासी या रेल्वे स्थानकातून ये जा करतात.
परंतु हे स्थान या स्थानकावर प्रवाशांसाठी कोणत्याही प्रकारची सोयी सुविधा उपलब्ध नव्हती तसेच या ठिकाणी रेल्वे स्थानकाला बकाल अवस्था प्राप्त झाली होती. याची दखल घेत लायन्स क्लब ऑफ मोहने टिटवाळा अध्यक्ष दया शेट्टी झोन अध्यक्ष डॉक्टर अभिलाषा रवी सिंग झोन चेअरमन रूपा शेट्टी मोहने विभाग सेक्रेटरी रोहन कोट यांनी या स्टेशनचा कायापालट करण्याचे ठरविले.
आंबोली स्टेशनचे स्टेशन मॅनेजर यांची भेट घेऊन आंबिवली स्थानकावर आकर्षक भिंती चित्रे स्लोगन्स सामाजिक संदेश चित्रे रेखाटण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला. याबाबतचे पत्र सादर केले. आंबिवली रेल्वे प्रशासनाने याबाबतची मुंबई सेंट्रल रेल्वे प्रशासनाकडून परवानगी घेतली. आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन आंबिवली रेल्वे स्टेशनला रंगरंगोटी करण्याचे काम मोठ्या प्रमाणात लायन्स क्लब ऑफ यांच्या खर्चाने हाती घेण्यात आले. लायन्स क्लबचे लोगो__
* एड्स जनजागृतीचे लोगो
* झाडे लावा झाडे जगवा पाणी हेच जीवन आहे
* नशा करून ट्रेनने प्रवास करू नका
* तंबाखू सोडा कर्करोग टाळा
* डायबिटीस या रोगाची जनजागृती
* मुलगा मुलगी एक समान देऊ त्यांना शिक्षण छान
यांसह अनेक नैसर्गिक चित्रे व पक्षांची व प्राण्यांची चित्रे या सानकावर रेखाटली आहेत अनेक प्रकारचे भिंती चित्रे व सामाजिक संदेश देणारे चित्र रेल्वे स्थानकावर रेखाटल्याने संपूर्ण रेल्वे स्थानकाचे रूप पालटले असून आकर्षक रेल्वे स्थानकामध्ये अंबिवली स्थानकाने आपला मानाचा तुरा रोवला आहे. आंबिवली स्थानक प्रवाशांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत असून अनेक प्रवासी या स्वच्छतेमुळे रंगरंगोटीमुळे आनंद व्यक्त करीत आहेत. शेकडो प्रवासी फोन करून प्रत्यक्ष भेटून लायन क्लब ऑफ अध्यक्ष दया शेट्टी यांचे अभिनंदन तसेच आभार व्यक्त करीत आहेत.
No comments:
Post a Comment