Wednesday, 25 October 2023

ऐन दसरा दिवाळीच्या सणात उल्हासनगर शहर वाहतूक शाखेचा वाहनचालकांना जोरका 'झटका, ?

ऐन दसरा दिवाळीच्या सणात उल्हासनगर शहर वाहतूक शाखेचा वाहनचालकांना जोरका 'झटका, ?

कल्याण, (संजय कांबळे) : सर्वत्र दसरा आणि दिवाळी सणाची लगबग सुरू असताणाच नवनियुक्त पोलीस निरीक्षक अविनाश भामरे यांनी पदभार स्विकारताच उल्हासनगर शहर वाहतूक शाखेने कारवाई चा फटका लावल्याने अनेक वाहन चालकांना जोरका झटका बसला, आज एका दिवसात तब्बल ८५ हजार ४०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामुळे वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.

आज  २५ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी ११ ते १२ या केवळ एका तासांची म्हारळ नाका, कल्याण, नगर राष्ट्रीय महामार्गा या ठिकाणी फ्लॅश डिप्लॉयमेंट कारवाई कारवाई करण्यात आली. यामध्ये विदाऊट हेल्मेट ६१, मोबाईल टॉकिंग ४, विना सीट बेल्ट ७, विदाऊट युनिफॉर्म ७, ट्रिपल सीट २  लायसन्स जवळ न बाळगणे ७, ऑटो  रिक्षा कारवाई १४, आणि इतर 22 अशा एकूण १२४ कारवाई  करून ८५ हजार ४०० रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे. तसेच एकूण ४ हजार रुपये थकित ई चलान वसुली करण्यात आली आहे.

       सदर कारवाई करिता १ पोलीस अधिकारी ७ पोलिस अंमलदार व ७ वार्डन हजर होते. विशेष म्हणजे सध्या दसरा, दिवाळी असल्याने अनेक मोटारसायकल, रिक्षा, व इतर वाहने ही उल्हासनगर मार्केटमध्ये जातात, येथे जाण्या येण्यासाठी म्हारळनाका, धोबीघाट हा मार्ग वाहन चालकासाठी सोईचा व विनात्रासदायक वाटतो, मात्र नेमकी ही गोष्ट लक्षात घेऊन उल्हासनगर शहर वाहतूक शाखेने आज सकाळी म्हारळनाका येथे फ्लँश डिप्लाँयमेंट कारवाई केली. अचानक या कारवाई मुळे मोटारसायकल स्वार गोंधळून गेले, अनेक वेळा वाहतूक पोलीस व वाहनचालक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.तसे पाहिले तर सध्या ओहरशिट, भरधाव गाडी चालविणे, लहान मुलांना गाडी देणे, कर्कश हार्न, असे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे आशा वाहन चालकावर कारवाई व्हायलाच पाहिजे असे काही नागरिकांनी मत व्यक्त केले तर यामुळे काही प्रामाणिक वाहनचालकांना याचा त्रास होतो आहे याचाही विचार वाहतूक विभागाने करावा असे सामाजिक कार्यकर्ते सुरेश गायकवाड यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! घाटकोपर, ...