Wednesday, 25 October 2023

ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री श्री. दीपक केसरकर यांच्या हस्ते संपन्न !!

ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री श्री. दीपक केसरकर यांच्या हस्ते संपन्न !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

                मुंबई मधील स्वर रंग सभागृह, यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉइंट, मुंबई येथे आज बुधवार दि.२५ ऑक्टोबर २०२३ रोजी ड्रग फ्री मुंबई अभियानाचा शुभारंभ राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा या गीताने झाला. शालेय विद्यार्थी आणि तरुण मुलांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी मा. मंत्री, शालेय शिक्षण व मराठी भाषा तथा पालकमंत्री मुंबई शहर श्री. दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार व नेतृत्वात मुंबई शहर जिल्ह्यामध्ये "ड्रग फ्री मुंबई अभियान" ४५२ शाळांमध्ये ज्युनिअर कॉलेज मध्ये नोव्हेंबरपासून राबविण्यात येत असून प्रत्येक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात स्टूडेंट प्रहरी क्लब स्थापना करण्यासाठी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचा सहभाग असणार आहे.

            सदर अभियान जिल्हाधिकारी मुंबई शहर व जिल्हा महिला व बाल विकास विभाग, मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे.अभियानाची प्रस्तावना नशाबंदी मंडळाचे चिटणीस इम्तियाज मोगल यांनी मांडून पुढील काळात प्रतेक शाळेत २० विद्यार्थी मुली आणि मुले  आणि १ शिक्षक याची टीम असेल त्यांच्या द्वारे  राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.

           मंत्री महोदयांनी उपस्थितांना संबोधित करताना मुंबईतील शाळेत, कॉलेज्यात हे अभियान राबविल्यामुळे मुलांना व्यसनांच्या दुष्परिणामांची माहिती मिळेल ते परावृत्त राहतील  व्यसनमुक्ती साठी हे व्यसनमुक्त दुत असून मुंबईतील ड्रग वर नियंत्रण आणण्यात या  विद्यार्थ्यांची मदत होणार असून हे व्यसनावर नियंत्रण आणणारे सच्चे प्रहरी ठरणार असून हा प्रकल्प व्यसनमुक्ती क्षेत्रात दिशादर्शक प्रकल्प ठरणार आहे. 

          येणाऱ्या काळात हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबवले जाईल. जिल्हाधिकारी, मुंबई शहर श्री.राजेंद्र क्षीरसागर यांनी सदर अभियानामुळे मुंबईत ड्रग फ्री होण्यासाठी मदत होणार असल्याचे मत व्यक्त केले. मान्यवराचे शुभसंदेश हे ड्रग फ्री मुंबई अभियानाच्या सदिच्छा व्यक्त करताना बालकांनी व युवकांनी यात आपला सहभाग देऊन देशातील या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी आपले योगदान देऊन आपला देश अधिक सशक्त व समृद्ध करावा असे आवाहन केले.

         अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी लोगो, पोस्टर्स, ब्रोशर, टी शर्ट, बॅच, टोल फ्री क्रमांक यांचे अनावरण करण्यात आले. व्यसनमुक्ती कार्यकर्ता चार्ली चॅप्लिन वेशभुषक वरप्रभा हे खास आकर्षण होते आपल्या कले द्वारे  त्यानी व्यसनमुक्तीचे विविध इनोव्हेटिव्ह पोस्टर घेऊन उपस्थितांना संदेश दिला.पार्श्वगायक श्री. गंधार जाधव यांनी Say No To Drugs हे गीत सादर केले. तसेच शालेय विद्यार्थिनी हिने व्यसनमुक्ती वरील गीत सादर केले. एम. डी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना,जन जागृती विद्यार्थी संघ यांनी नशा नाश,पथनाट्य सादर केली.

           आज नशाबंदी मंडळाला ६५ वर्ष पूर्ण होत आहे त्याचा आम्हा सर्वांना आनंद आहे. एका ऐतिहासिक मंडळाचे कार्य  करत असताना पालक मंत्री महोदयांनी दिलेली जबाबदारी  पार पाडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.आज देशाची भावी पिढी वाचवायची असेल तर महाराष्ट्र व्यसनमुक्ती च्या दिशेने पाऊल उचलले पाहिजे त्याची या अभियानाने आज सूरूवात झाली असे नशाबंदी मंडळ च्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास म्हणाल्या या निमित्ताने संविधान चे ४७ कलम सन्मान चिन्ह देऊन मंत्री महोदय आणि जिल्हाधिकारी महोदय यांचे सन्मान करण्यात आला.
            यावेळी पालक मंत्री यांच्या हस्ते सहभागी संस्था, संघटना याचे संविधानाच्या ४७ कलम सन्मान पत्र देऊन पुरस्कृत केले गेले यावेळी गेट वे ऑफ इंडिया मुंबई ते इंडिया गेट दिल्ली सायकल वर ड्रग्स फ्री महाराष्ट्र चां संदेश  देणाऱ्या  कार्यकर्ता याचे पण मंत्री महोदयांनी सन्मानपत्र देऊन पुरस्कृत केले. या कार्यक्रमात मुंबई शहरातील शाळा ,कॉलेज शिक्षकाचा मोठ्या प्रमाणात  सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नशाबंदी मंडळाचे चिटणीस अमोल स. भा. मडामे यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा महिला बालविकास अधिकारी, मुंबई शहर श्रीम. शोभा शेलार यांनी केले.
            या शुभारंभ कार्यक्रम  नियोजनात नशाबंदी मंडळ आणि महिला बाल विकास याच्या सर्व कार्यकर्ते आणि अधिकारी यांनी अथक प्रयत्न केले. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

No comments:

Post a Comment

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! घाटकोपर, ...