Tuesday, 24 October 2023

महिलांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करणारी वेशभूषा व रॅम्प वॉक स्पर्धा नालासोपारा येथे संपन्न....

महिलांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करणारी वेशभूषा  व रॅम्प वॉक स्पर्धा नालासोपारा येथे संपन्न....

वसई , प्रतिनिधी : शिवसेना व जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतिने नालासोपारा येथे महिलांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करणारी वेशभूषा व रॅम्प वॉक स्पर्धा संपन्न झाली.
नालासोपारात पहिल्यादांच आयोजित केलेल्या या स्पर्धेबद्दल महिलांमध्ये मोठी उत्सुकता दिसून आली. 

या स्पर्धेत पारंपारिक आणि आकर्षकव हटके वेशभुषेत सहभागी झालेल्या महिलांनी आत्मविश्वासपुर्वक व्यासपीठावर येत आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले. स्पर्धेत महिलांनी गीत - संगिताच्या तालावर नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

स्थानिक स्तरावरील महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा  एक दिवस घराबाहेर पडून महिलांनी स्वतःसाठी जगाव  तसेच  स्त्री आपला संसार, मातृत्वाची जबाबदारी सांभाळताना स्वतःचे अस्तित्व विसरून सर्वस्व पणाला लावते. पुढे मुले मोठी होतात साहजिकच आपल्या विश्वात रमतात आणि ती मात्र एकटी पडत जाते.

महिलांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
वेशभुषा स्पर्धेत महिलांमध्ये प्रथम क्रमांक -  अश्विनी पाटील, व्दितीय क्रमांक - तनया मासावकर, तृतीय क्रमांक- बेला शेजवळ, रॅम्प वॉक स्पर्धेत प्रथम क्रमांक - मोनिका नवले, व्दितीय क्रमांक - नम्रता पानसरे, तृतीय क्रमांक- प्राजक्ता कापसे, समशाद पटेल यांनी बक्षिस पटकाविले.

या स्पर्धेत लहान मुला - मुलींनी सहभाग घेऊन कर्तुत्वान महिलांच्या वेशभुषा साकारून त्यांचे कार्यभार आपल्या वक्तृत्वातुन सादर केले यामध्ये राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज यांची  वेशभुषा सादर केली. यामध्ये सर्वात आकर्षक अडीच वर्षाचा अथांच अविनाश कांबळे या चिमुकल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभुषा साकारली.

लहान मुलांमध्ये वेशभुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक- संजीवनी जोगळे, व्दितीय क्रमांक- रिया कानडे, तृतीय क्रमांक - विज्ञा कांबळे, अथांश कांबळे. यांनी क्रमांक पटकविले विजेत्यांना शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

जिजाऊ संस्था समाजातील  महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवत असते यामुळे महिलांना प्रेरणा मिळत असुन समाजातील महिलांचा एकोपा वाढताना दिसून येत आहे असे प्रतिपादन शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी केले.

यावेळी जेष्ठ पत्रकार रविंद्र माने, दत्त मंदिराचे ट्रस्टी तसेच जिजाऊ संस्थेचा तालुकाप्रमुख हर्षालीताई खानविलकर स्वयंसेवक अमित नाईक अभिषेक गोरूले अभिषेक गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! घाटकोपर, ...