रविवारी दुर्गाडी देवीच्या दर्शनाला मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे !!
कल्याण , प्रतिनिधी : कल्याण येथील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गाडी देवी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरी केला जात आहे. वर्षोनुवर्षे ही परंपरा सुरु असून दुर्गाडी देवीचे दर्शन दरवर्षी हजारो लाखो भाविक घेत असतात. यावर्षी येथे दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी पहावयास मिळत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी कल्याण येथे येत दुर्गाडी देवीचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. आमदार विश्वनाथ भोईर, कल्याण शहर प्रमुख रवी पाटील हे यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्गाडी देवीचे दर्शन घेत केली यावेळी दुर्गाडी किल्ल्याच्या डागडुजीसाठी साडे सात कोटी मंजूर केलेले आहेत. त्यात अडीच कोटींचं काम सुरू आहे.
पाच कोटींचे काम सुरू होईल आणखी जे काही कामाला पैसे लागतील ते देखील शासनाच्या वतीने देण्यात येईल. या किल्ल्याची या देवस्थानाची अनेक वर्षाची परंपरा आहे. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून काही कमी पडणार नाही. महाराष्ट्र मध्ये यंदा नवरात्र उत्सव गेल्या वर्षी पेक्षा जास्त उत्साह यावर्षी पाहायला मिळतं आहे असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
No comments:
Post a Comment