Thursday, 5 October 2023

मित्रावर गोळीबार करून पळून जाण्याचा तयारीत असलेल्या अरोपिला अवघ्या २४ तासात केली अटक !!

मित्रावर गोळीबार करून पळून जाण्याचा तयारीत असलेल्या अरोपिला अवघ्या २४ तासात केली अटक !!

अरूण पाटील, भिवंडी (कोपर) :
            कल्याणच्या मोहने परिसरात  मित्रावर गोळीबार करून पळून जाण्याचा तयारीत  आसलेल्या आरोपीला कल्याण गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासात अटक. केली आहे. या गोळीबारात सुशील मोहंतो हा तरुण जखमी झाला होता. .
             याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश आणि सुशील यांच्यात आधीपासून वाद होता. काल हे दोघे आपल्या काही मित्रांसह दारू पार्टी करत होते. यावेळी जुन्या वादातून उमेशने गोळीबार केला होता. कल्याण जवळ असलेल्या मोहने परिसरातील एका घरात सुशील मोहंतो आणि उमेश खानविलकर हा आपल्या मित्रासोबत दारू पार्टी करत होता. सुशील आणि उमेश मध्ये जुना वाद होता. या पूर्ववैमनस्यातून उमेशनं सुशीलवर गोळ्या झाडल्या होत्या.
              सुशीलने बचावासाठी हात पुढे केला असता गोळी त्याचा हात फाडून त्याच्या तोंडात गेली. जखमी झालेल्या सुशीलला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. गोळीबारानंतर उमेश पसार झाला होता. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कल्याण क्राईम ब्रँचदेखील या आरोपीचा शोध घेत होते.
             उमेश शहाड परिसरात लपून बसला असून तो तेथून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रँचला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या परिसरात सापळा रचत उमेशला अटक केली. दरम्यान उमेशने बंदूक कुठून आणली याचा तपास खडकपाडा पोलीस करत आहेत.

No comments:

Post a Comment

गेल ओम्वेट आणि भारत पाटणकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित माहितीपट 14 डिसेंबरला कोल्हापूरमध्ये प्रदर्शित !!

गेल ओम्वेट आणि भारत पाटणकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित माहितीपट 14 डिसेंबरला कोल्हापूरमध्ये प्रदर्शित !! ** Gail & Bharat (2025) दिग्दर...