शिवसेना गटाचे १६ आमदार अपात्रेबाबत चालढकल, सुनावणी पुन्हा लांबणीवर, धाकधूक वाढली !!
अरूण पाटील, भिवंडी, (कोपर) :
शिवसेना गटाचे १६ आमदार अपात्रे बाबत चालधकल होऊन सुनावणी पुन्हा लांबणीवर गेल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची धाकधूक वाढली आहे. येत्या ९ ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी होणार होती. मात्र, आता ही सुनावणी ३ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना गटाचे १६ आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्याची गेल्या महिनाभरातील ही चौथी वेळ आहे. याआधी तीनवेळा या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे. १६ आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर व्हावी, यासाठी ठाकरे गट आग्रही आहे. मात्र, सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेत आमदार अपात्रतेची याचिका दाखल केली होती. कोर्टाने यावर सुनावणी घेत १६ आमदार अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं होतं.
मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या प्रकरणात वेळ काढूपणा करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेताना कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना फटकारलं होतं. त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी या प्रकरणाची सुनावणी घेण्याचं कोर्टाकडून सांगण्यात आलं.
मग ६ ऑक्टोबर, त्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी या प्रकरणाची सुनावणी घेण्याचं ठरलं होतं. मात्र, आता ९ ऑक्टोबर रोजी होणारी सुनावणी महिनाभर पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी आता ३ नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या तारखेला तरी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी होणार, की पुन्हा नवी तारीख मिळणार या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
ठाकरे गटाचे आमदार अपात्र होतील
ReplyDelete3नोव्हेंबर ला 5 राज्याचे निकाल आहेत ना.कर्नाटक,36गड,मध्यप्रदेश,राजस्तान, आणी उत्तरप्रदेश.
ReplyDeleteअलीबाबा आणी चाळीच चोर