उल्हासनगर वाहतूक उपविभागा तर्फे एका दिवसात एकशेछत्तीस वाहनावर कारवाई, तब्बल त्र्याणव हजाराच्या दंडाची आकारणी !
कल्याण, (संजय कांबळे) : आज बुधवार दिनांक 4/10/2023 रोजी उल्हासनगर वाहतूक उपविभागा तर्फे कल्याण बदलापूर रोडवर उल्हासनगर शहरात शांतीनगर ते डर्बी चौक या रोडवर कार बाजार, कार विक्रेते, गॅरेज यासमोर वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी वाहने, तसेच इतर वाहने यांच्यावर पोलीस निरीक्षक विजय गायकवाड व त्यांच्या पथकामार्फत फ्लॅश कारवाई मोहीम राबवण्यात आली यामध्ये केवळ एका दिवसात विविध कलमानुसार १३६ वाहने धारकावर कारवाई करून तब्बल ९३ हजार ४०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. या धडाकेबाज कारवाई मुळे उल्हासनगर शहर वाहतूक शाखेचे कौतुक होत आहे.
उल्हासनगर वाहतूक उपविभागातर्फे प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविले जात असतात, हे करत असताना शहरात वाहतूकीस अडथळा निर्माण करणाऱ्या व इतर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकां विरोधात कारवाई सुरू असते, अशीच फ्लँश कारवाई मोहीम आज राबविण्यात आली. यामध्ये वाहतुकीस अडथळा २३, गणवेश परिधान न करणे, मोटरसायकल ट्रिपल सीट, 4, फ्रंट सीट 3, मोबाईल टाँकिंग 6, विदाऊ हेल्मेट, 83, विदाऊट सीटबेल्ट 2 ,लायसन्स जवळ न बाळगणे 7 असे एकूण 136 वाहनावर कारवाई करून सुमारे 93 हजार 400 रुपये दंड आकारण्यात आला.
तसेच इथून पुढे देखील नियमित कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस निरिक्षक विजय गायकवाड यांनी सांगितले आहे.
No comments:
Post a Comment