१७ व्या ऑल इंडिया (आमंत्रित) कराटे चँम्पियनशिप-२०२३ (स्वाभिमान भारत कप) मध्ये रितिका भोसले दोन गोल्ड मँडलची मानकरी !!
मुंबई उपनगर, (शांताराम गुडेकर) :
प्रियदर्शिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मुलुंड येथे सोमवार दि.२ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या १७ व्या ऑल इंडिया (आमंत्रित) कराटे चॅम्पियनशिप-२०२३ (स्वाभिमान भारत कप)) मध्ये विक्रोळी पार्क साईट येथील डॉ.सुहास भोसले, शिक्षिका सौ. रीता सु. भोसले यांची कन्या कु. रितिका सु.भोसले हिने उल्लेखनीय कामगिरी करत कुमिते (फाइट) मध्ये एक गोल्ड व काता मध्ये एक गोल्ड मेडल पटकावले.
स्पर्धेत ११ राज्यातील एकूण ६४८ खेळाडू सहभागी झाले होते.महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, केरला, उतर प्रदेश, राज्यस्थान, गोवा, तामिळनाडू, ओडिसा, तेलंगना या राज्याचे स्पर्धेक सहभागी झाले होते.रितिका हिने १८ वर्षावरील या मुलींच्या वयोगटात हे यश मिळवले. इंटरनेशनल इन्दो रयू कराटे दो फेडरेशनचे कोच फ्राज सर यांच्या मार्गदर्शनखाली तिने ही दोन गोल्ड मॅडल जिंकली. आजवर तीने अनेक सुवर्ण, रजत व कास्य पदक मिळवली आहेत. रितिका भोसलेच्या या यशाबद्दल तिला अनेकांकडून अभिनंदनासह शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment