Tuesday, 3 October 2023

लखीमपुर खेरी शेतकऱ्यांची हत्याकांडाला दोन वर्षे पूर्ण मंत्राच्या राजीनामा घ्यावा.. किसान सभेची मागणी

लखीमपुर खेरी शेतकऱ्यांची हत्याकांडाला दोन वर्षे पूर्ण मंत्राच्या राजीनामा घ्यावा.. किसान सभेची मागणी

चोपडा, प्रतिनिधी... हरियाणा मधील लखीमपूर खेरी येथे मोदी सरकार वरील मंत्राच्या दौऱ्यात त्यांना निवेदन सादर करावयास जाणाऱ्या शेतकऱ्यांवर मंत्र्याच्या मुलांनी गाडी चालवून चार शेतकरी व पत्रकार यांची हत्या केली त्या शेतकरी आंदोलक शहिदांच्या मारेकऱ्यांना शिक्षा करा व तत्कालीन मंत्री श्री मिश्रा यांच्या राजीनामा घ्यावा या मागणीसाठी किसान सभा चोपडा तालुका तर्फे चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन सादर करण्यात आले.

बाबत सविस्तर असे की___

मोदी सरकारच्या लादलेल्या तीन काळया शेतकरी विरोधी कायद्याना विरोध करण्यासाठी  शेतकऱ्यांचे दिल्ली येथे दोन वर्षांपूर्वी 374 दिवस आंदोलन झाले. त्या आंदोलनाचे दरम्यान हरियाणांमध्ये मोदी सरकारचा मंत्री लखीमपूर खेरी या गावी आलेअसता, त्यांना निवेदन देण्यासाठी जमलेल्या शेतकरी आंदोलकांवर मंत्री पुत्राने अंगावर गाडी घालून चार शेतकरी व एक पत्रकार यांना यांची हत्या केली. या घटनेला दोन वर्ष झाल्यानंतर सुद्धा केंद्र सरकारने त्या मंत्र्याची हकालपट्टी केलेले नाही, शिवाय त्यांच्यावर कोर्ट प्रक्रिया सुरू होऊन शिक्षाही झाली नाही या कृतीचा निषेध म्हणून शेतकरी संघर्ष समितीने देशवासी काळा दिवस पाडण्याचे आदेश दिले होते. 

त्यानुसार चोपडा येथे कामगार नेते कॉम्रेड अमृत महाजन, काँग्रेस शांताराम पाटील, दिनकर पाटील, रामचंद्र पाटील, भास्कर पाटील, भागवत मोरे, सुनील कोळी, रामभाऊ पाटील, विश्वनाथ पारधी आधी कार्यकर्ते व चोसाकामधील कामगारांनी संयुक्तपणे शेतकरी आंदोलनातील पाच शहिदांना अभिवादन करून तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन सादर केले निवेदनात म्हटले आहे की___

१) केंद्र सरकारने मंत्री पुत्र याचे वर कारवाई करून त्याला कठोर शिक्षा द्यावी. 
२) तसेच तत्कालीन मंत्री याची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी.
३) शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे समाधान करण्यासाठी स्वामीनाथन आयोग नुसार शेतीमालाचे भाव ठरवावे व धोरण ठरवावे चोसाका अंतर्गत कार्यरत कामगारांचे थकीत पगार व प्रॉव्हिडंट फंड आदा करा. शेतकऱ्यांचे थकीत पेमेंट अदा करा, औरंगाबाद हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे श्री भास्कर हरी पाटील या कामगारास साडेसात लाख रुपये थकीत रकमेचे हप्ता द्यावा व कायद्याचे पालन करावे अशी मागणी केली आहे. चोसाका कामगार व किसान सभेचे कार्यकर्ते यांनी स्व .एम एस स्वामीनाथन यांना आंदोलन कामगार संघटनेच्या मंडपात भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. असे कामगार नेते का अमृत महाजन यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले.


............आपले विश्वासू

No comments:

Post a Comment

शाहीर जयंत चव्हाण (बापू) कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !!

शाहीर जयंत चव्हाण (बापू)  कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !! मुंबई (शांताराम गुडेकर)               बालपणापासून गायन व...