Tuesday, 3 October 2023

_*"कातळवाडीतील भूमिपुत्र श्रीमान सोनू रामचंद्र नेवरेकर एक उत्तम कला आर्टिस्ट, एक निस्सीम गणेश भक्त"*_

_*"कातळवाडीतील भूमिपुत्र श्रीमान सोनू रामचंद्र नेवरेकर एक उत्तम कला आर्टिस्ट, एक निस्सीम गणेश भक्त"*_

✍🏻 *श्री.दिपक धोंडू कारकर / ९९३०५८५१५३*

भूतलावर प्रत्येक व्यक्तीच्या अंगी विविध कलागुण भरगच्च भरलेले असतात. प्रत्येकजण आपल्या अंगीकृत कलेच्या माध्यमातून आपले प्रभुत्व, आपली ओळख निर्माण करत असतो. नुकताच कोकणातील बहुप्रिय सण गणेशोत्सव पार पडला. कोकणचा गणेशोत्सव म्हणजे मायानगरी मुंबई एक दिवसांत खाली करण्याची कोकणी माणसात असणारी ताकद होय. घरोघरी लाडक्या बाप्पाच्या आगमनाची चातक पक्षाप्रमाणे प्रत्येकजण वाट पाहत असतो. एका वर्षाने, नव्या हर्षाने प्रत्येकजण प्रतिवर्षी बापाच्या आगमनाची तयारी जय्यतरित्या करत असतो. बहुतांशी कोकणात ५ दिवसांचे घरगुती गणपती सर्वाधिक प्रमाणात पाहायला मिळतात.

चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे कातळवाडी गावचे भूमिपुत्र असणाऱ्या गणेशभक्त सोनू नेवरेकर यांची कहाणी मनाला प्रफुल्लित करून जाते. गणेशभक्त सोनू नेवरेकर प्रतिवर्षी गणेशोत्सव सणाला आपल्या घरी गणरायाची लक्षवेधी करत असतात, ही त्यांची कैक वर्षाची परंपरा आजही त्यांची मुले ते सारे कुटुंबीय अबाधित ठेवत आहे. आम्ही लहान असताना आपल्या घरी गाईसोबत गणपतीची असणारी मूर्ती, पाठीमागे चक्र (सेलवर ) तेव्हा लाईट नव्हती आमच्या गावातील प्रथम अनंत चतुर्थी पर्यंत गणपती ठेवायला सुरवात करणारे, सहकारी शंकर रत्नु नेवरेकर ही होते. गणपतीत काहीतरी नवीन डेकोरेशन असायचे. आरती परंपरा ही त्यांनीच चालू केली. त्या काळात बराच खर्च ही करायचे. आता आपल्या वडिलांनी चालू केलेली परंपरा त्यांपेक्षाही जोमात सुरु ठेवली आहे. त्यांचा सुपुत्र सुशील नेवरेकर दरवर्षी मुंबईतून गणेश मूर्ती घेऊन तीला दाग -दागिन्यांनी सजवणे, शृंगारिक टच देऊन गावी नेणे. शिवाय प्रती वर्षी काहीतरी नवीन देखावा बनवणे हा त्यांचा छंद आहे. ह्या सगळ्यात सुशील सह त्यांच्या बहिणी कविता आणी गीतांजली मदत करत असतात. प्रत्येक वर्षी सुंदर नेत्रदीपक देखावा पहाणे ही गणेश भक्तांना एक पर्वणीच असते. आता आपल्या गावात खूप मुले नेत्रदीपक देखावे करत असतात पण सुशील नेवरेकर याने आपल्या वडिलांची परंपरा प्रामाणिकपणे जोपासली आहे. आरतीला येणाऱ्या मुलांनाही अगदी प्रेमाने, आपुलकीने प्रसाद म्हणून आवडीचा नाष्टा देत असतात.

श्रीमान सोनू नेवरेकर म्हणजे वाडीतील एक सामाजिक दायित्व जपणारे व्यक्तिंमत्व होय. गावच्या जाखडी नाच कलेत, शिमगा उत्सवात सामील होणारे, गावच्या प्रती जिव्हाळा राखत, नुकतीच बॉम्बे हॉस्पिटल मधून अनेक वर्षे वैद्यकीय सेवा बजावत सेवानिवृत्त होणाऱ्या अशा प्रेमळ, हौशी, दानशूर आणि ममत्व जपणाऱ्या नेतृत्वाला पुढील वाटचालीस अनेक यशदायी शुभेच्छा..!!!

No comments:

Post a Comment

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !!

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !! भिवंडी, प्रतिनिधी : ठाणे जिल्...