मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद ; वीर गावच्या जावळे बंधूंनी जोपासली सामाजिक बांधिलकी !
चिपळूण - ( दिपक कारकर )
तालुक्यातील अतीशय दुर्गम ग्रामीण भागात, अंतिम टोकाच्या, निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या वीर गावी गणेशोत्सव सणाचे औचित्य साधून श्री.भैरी भवानी प्रतिष्ठान, वीर तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामीण भागातील लोकांना आरोग्याची काळजी घेताना,अशा सुविधा घर जवळीक उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ह्या उपक्रमाला वाडीतील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
वीर गावचे भूमिपुत्र दशरथ/ चंद्रकांत/ शशिकांत जावळे बंधूंची ही संकल्पना होती. नोकरी करिता - करिता समाजहितासाठी तळमळीने काम करणाची त्यांची धडपड सदैव असते. आरोग्य तपासणी शिबिर व जि.प.जावळेवाडी शाळा नं.४ येथील शाळेला थोर महापुरुषांच्या प्रतिमा/विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
सदर उपक्रमाला भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष - संतोषजी जैतापकर, वीर देवपाट गावच्या सरपंच महोदया श्रेया वीरकर मॅडम, गावचे गावकर - दत्ताराम दुर्गोळी, गावचे कारभारी - वसंत जावळे, पत्रकार दिपक कारकर , अ.म.कु.से. संघ उपाध्यक्ष - रमाकांत जावळे, जावळेवाडी शाळा नंबर ४ च्या शिक्षिका - साक्षी मॅडम, रुग्णसेवक सचिन धुमाळ, रघूनाथ जावळे, महादेव सोलकर, महेंद्र जावळे, नितिन जावळे, रमेश दुर्गोळी, प्रकाश दुर्गोळी, संतोष जैतापकर वैद्यकीय टीम व विद्यार्थी वर्ग, डेरवन रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स टीम आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संयोजक श्री.भैरी भवानी प्रतिष्ठान वीर तर्फे सर्व देणगीदार, हितचिंतक व मान्यवरांचे सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक कारकर तर आभारप्रदर्शन रमाकांत जावळे यांनी मानले. ह्या स्तुत्य उपक्रमाचे पंचक्रोशीतून अभिनंदनासह कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment