Tuesday, 3 October 2023

शिवडी पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी, मोबाईल स्नचिंग करणाऱ्या आरोपीस एक तासात पकडुन गुन्हा केला उघड !

शिवडी पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी, मोबाईल स्नचिंग करणाऱ्या आरोपीस एक तासात पकडुन गुन्हा केला उघड !

मुंबई (क्राईम वार्ताहर), विकास जगताप :

क्राईम सुत्रला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवडी पोलीस ठाणे, मुंबई. गुरक्र 168/2023 क. 392 भादवि नुसार फिर्यादीचे नाव- श्री, नवनीत गौरीशंकर मिश्रा, वय ३० वर्षे, धंदा- नोकरी (मर्चट नेव्ही), रा. टी. बिल्डींग नं ५०, रूम नं. ०१, तळमजला, वैती बिल्डींग, कॉपर स्मिथ स्ट्रीस्ट, माझगाव, मुंबई यांचे फिर्यादीवरून 28/09/2023 रोजी 01:30 वा.गुन्हा दाखल करण्यात आला, सदर गुन्हा दि. 27/09/2023 रोजी 23.30 च्या सुमारास घडला हा गुन्हा बी पी टी रोड, माझगाव डॉककडे जाणारे फाटक गेट, फ्री वे च्या खाली उत्तर वाहिनी या ठिकाणी घडला आहे,

आरोपी इसम जाफर अब्दुल शेख वय 27 वर्ष राठी मस्जिद गल्ली नागोरी हॉटेल समोर कौला बंदर झोपडपट्टी रे रोड मुंबई 10 यांचे विरोधात भायखळा पोलीस ठाणे गुरक्र 54/19 कलम 392 भादवी शिवडी पोलीस ठाणे गुरक्र 125/14 कलम 326, 323, 504, 143, 147, 149 भादवी शिवडी पोलीस ठाणे गुरक्र 491/22 कलम 498 भादवि नुसार दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले,

चोरीस गेलेला मुद्देमाल किं. अं. ४०,०००/- किंमतीचा सॅमसंग एम २० अल्ट्रा ग्रे रंगाचा जुना वापरता मोबाईल त्यामध्ये जिओ कंपनीचे सिमकार्ड क्र 7303537459 IMEI NO:- 352649111684781/01

सविस्तर वर्णन असे की यातील नमूद तारीख वेळी व ठिकाणी वर नमूद आरोपीताने मोटरसायकल वरती येऊन फिर्यादी यांच्या हातातील वर नमूद वर्णनाचा मोबाईल बळजबरीने हातातून हिसकावून चोरी केला म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्ह्याची माहिती मिळताच सपोनी स्नेहलसिंग खुळे व पथक घटनास्थळी जावून तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी हा शिवडी फाटक च्या दिशेने जात असल्याचे दिसले तसेच चोरीस गेलेल्या मोबाईलचे लोकेशन प्राप्त केले असता ते कॉटन ग्रीन पार्किंग येथे असल्याचे समजले सदर ठिकाणी गेलो असता तो मिळून आला नाही, पुन्हा लोकेशन घेतले असता तो शिवडी फाटक परिसरात असल्याचे समजताच सदर ठिकाणी जावून शोध घेतला असता एक इसम पोलीस पथकास पळून जाण्याच्या बेतात असताना पोलीस पथकाने त्यास शिताफीने ताब्यात घेवून गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता, नमूद परिसरात त्याच्या KTM मो/सायकल चा शोध घेतला असता आर्यन ट्रान्सपोर्ट शिवडी येथे मिळून आली, मो/सायकल तपासून पाहिले असता त्यात 4 मोबाईल मिळून आले, सदर बाबत विचारणा केली असता त्यात एक वर नमूद वर्णनाचा मोबाईल मिळून आल्याने वर नमूद गुन्ह्यातील मोबाईल चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने, सदर आरोपीस माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांची तंतोतंत पालन करून व नमूद आरोपीस अटक करण्यात आले. त्यावेळी हस्तगत मालमत्ता किं. अं. ४०,०००/- किंमतीचा सॅमसंग एम २० अल्ट्रा ग्रे रंगाचा जुना वापरता मोबाईल किं. अं. १५,०००/- किंमतीचा ओपो काळ्या रंगाचा जुना वापरता मोबाईल किं. अं. २०,०००/- किंमतीचा विवो गोल्डन रंगाचा जुना वापरता मोबाईल किं. अं. २०,०००/- किंमतीचा विवो पिस्ता रंगाचा जुना वापरता मोबाईल किं. अं. १,२५,०००/- kTM moter cycle एकूण किंमत २,२०,०००/- हस्तगत करण्यात आला.

सदर तपास पथक सपोनी स्नेहलसिंह खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहक्र 00566/ मुजावर, पोशिक्र 111661/जाधव, पोशिक्र 111627/ आठरे, पोलीस शिपाई 140543/ लाड यांनी केला तसेच पुढील तपास पोउनि जितेंद्र पाटील करत आहेत.

No comments:

Post a Comment

ठाणे जिल्हयातील चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली हा दोन नॅशनल हायवेनां व औद्योगिक क्षेत्राला जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. सदर रस्त्या...